मराठी बातम्या /बातम्या /देश /

राहुल गांधींनी सरकारला विचारली 50 कर्जबुडव्यांची नावं, अनुराग ठाकुरांनी दिलं खरमरीत उत्तर

राहुल गांधींनी सरकारला विचारली 50 कर्जबुडव्यांची नावं, अनुराग ठाकुरांनी दिलं खरमरीत उत्तर

ठाकूर म्हणाले, काँग्रेस आपली पापं इतरांच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करीत आहेत

ठाकूर म्हणाले, काँग्रेस आपली पापं इतरांच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करीत आहेत

ठाकूर म्हणाले, काँग्रेस आपली पापं इतरांच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करीत आहेत

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 16 मार्च : येस बँक (Yes Bank) संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत बँक डिफॉल्टर्स म्हणजेच कर्जबुडव्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. सोमवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच येस बँक प्रकरणात विरोधकांनी गदारोळ केला. यानंतर राहुल गांधींनी सरकारला विचारले की, देशातील 50 टॉप विलफुल बँक डिफॉल्टर्स (Willful Defaluters) कोण आहेत? यानंतर सभागृहात पुन्हा गदारोळ सुरू झाला. राहुल गांधींच्या या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी राहुल गांधींना आकडेमोड ऐकवली. ठाकूर म्हणाले की, वेबसाइटवर विलफुल डिफॉल्टर्सची नावे सापडतील, यात काही लपवण्यासारखं नाही. अनुराग ठाकूर पुढे म्हणाले, 50 डिफॉल्टर्सची यादी वेबसाइटवर आहे. 25 लाखांहून अधिक रक्कम असलेल्या डिफॉल्टर्सची नावे वेबसाइटवर दिली जातात. कॉंग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले की, ते आपली पापं इतरांच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी सर्व डिफॉल्टर्सची नावे वाचण्यास आणि सभागृहाच्या पटलावर ठेवण्यास तयार आहे. अर्थ राज्यमंत्री म्हणाले, 'कॉंग्रेस सरकार असताना लोक पैसे घेऊन देशातून पळून गेले. आमचे सरकार फरार झालेल्यांवर कारवाई करीत आहे. आतापर्यंत आमच्या सरकारने चार लाख 31 हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. आमच्या सरकारने फ्युजिटिव इकोनॉमिक ऑफेंडर बिल आणले आबे. राहुल यांच्यावर निशाणा साधत अनुराग ठाकूर म्हणाले की, सभागृहामधील अशा प्रश्नावरून संबंधित खासदाराला या विषयावर किती समज आहे हे दिसून येते. येस बँकेवरील संकटाबाबत ते म्हणाले, बँकेचा प्रत्येक डिपॉजिट सुरक्षित आहे. यावर राहुल गांधी उत्तर देत म्हणाले, एक खासदार होण्याच्या नात्याने मला सभागृहात प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मात्र सरकारने त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही तर मुद्द्यांवरुन मागे हटताना दिसत आहे. हे वाचा -  मध्य प्रदेश: फ्लोअर टेस्टसाठी सुप्रीम कोर्टात BJP, शिवराज यांनी दाखल केली याचिका विलफुल डिफॉल्टर म्हणजे काय डिफॉल्टर म्हणजे हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणे. जर सोप्या शब्दात सांगायचे तर, अशी कोणतीही व्यक्ती किंवा कंपनी ज्यांच्याकडे कर्जाची परतफेड करण्यासाठी रक्कम असतानाही त्याने बँकेचा हप्ता भरला नाही आणि बँक अशा व्यक्ती वा कंपनीविरोधात कोर्टात जाते. अशा व्यक्तीला किंवा कंपनीला विलफुल डिफॉल्टर म्हणतात.
First published:

Tags: Loksabha, Rahul gandhi

पुढील बातम्या