मोदींना प्रश्न विचारतांना राहुल गांधींची आकड्यात चूक, सोशल मीडियावर झाले ट्रोल!

मोदींना प्रश्न विचारतांना राहुल गांधींची आकड्यात चूक, सोशल मीडियावर झाले ट्रोल!

राहुल गांधींनी मोदींना तीन प्रश्न विचारले. त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंय ट्रोल केलं.

  • Share this:

नवी दिल्ली 2 जानेवारी : राफेलच्या मुद्यावरून बुधवारी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. राहुल यांनी सकाळ संध्याकाळ पत्रकार परिषदा घेऊन राफेल वरून मोदींना टार्गेट केलं. संध्याकाळी पत्रकार परिषद झाल्यानंतर एक ट्विट करून राहुल गांधींनी मोदींना पुन्हा काही प्रश्न विचारले. दोन प्रश्नांना आकडे टाकल्यानंतर तीन लिहिण्याऐवजी त्यांनी चार अशी संख्या लिहिली. मात्र प्रश्न तीनच विचारले. त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंय ट्रोल केलं.

 

ऋषी बागरी म्हणतात आकडा टाकण्यात तुमची चूक झालीय. इथेही तुम्ही 25 टक्क्यांचा घोटाळा केला का?

तर दुसऱ्या एकाने विचारलं की तुम्ही 3 रा प्रश्न दिलेलाच नाही तर त्या प्रश्नाचं उत्तर कसं देणार?

राहुल गांधींनी मोदींना ट्विटरवर हे तीन प्रश्न विचारले.

1) हवाईदलाला 126 विमानांची गरज असताना फक्त 36 विमानेच खरेदी करण्याचा करार का केला?

2) एका विमानाची किंमत 560 कोटी ठरली असताना 1,600 कोटींना ते का खरेदी करण्यात आलं?

4) विमान बनविण्याचं कंत्राट सरकारी मालकीच्या HAL ला देण्याऐवजी ते खासगी कंपनीला का दिलं?

First published: January 2, 2019, 10:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading