S M L

कर्नाटकच्या सत्तेवरून राहुल गांधी आणि अमित शहा यांच्यात रंगलं ट्विटर वॉर

शपथविधीनंतर लोकशाहीचा खून केल्याची टीका राहुल गांधींनी ट्विटरवरून केली तर त्याला प्रतिउत्तर देत अमित शहा यांनीही ट्विट केलं आहे. काँग्रेस अध्यक्षांना त्यांच्या पक्षाचा इतिहास आठवत नसेलच, अशी प्रतिटीका अमित शहा यांनी दिली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 17, 2018 12:43 PM IST

कर्नाटकच्या सत्तेवरून राहुल गांधी आणि अमित शहा यांच्यात रंगलं ट्विटर वॉर

17 मे : येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राहुल गांधी आणि अमित शहांमध्ये सध्या ट्विटर वॉर रंगलं आहे. शपथविधीनंतर लोकशाहीचा खून केल्याची टीका राहुल गांधींनी ट्विटरवरून केली तर त्याला प्रतिउत्तर देत अमित शहा यांनीही ट्विट केलं आहे. काँग्रेस अध्यक्षांना त्यांच्या पक्षाचा इतिहास आठवत नसेलच, अशी प्रतिटीका अमित शहा यांनी दिली आहे.

राहुल गांधींनीं केलेलं ट्विट

बहुमत नसताना भाजप सरकार स्थापन करतंय. भाजप संविधानाची खिल्ली उडवत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केलीय. भाजप आज विजयी जल्लोष करेल, तर दुसरीकडे संपूर्ण देशाला लोकशाहीच्या पराभवाचं दुःख असेल, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे. 

 

अमित शहां यांनी प्रतिटोला देत केलेलं ट्विट

अमित शहा यांनी ट्विटरवरून राहुल गांधींना उत्तर दिलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांना साहजिकच त्यांच्या पक्षाचा दैदिप्यमान इतिहास आठवत नाहीये. भयानक आणीबाणी, कलम ३५६ चा दुरुपयोग, न्यायालयाचा, माध्यमे आणि नागरी सोसायटीचा अवमान हाच तर राहुल गांधींच्या पक्षाचा इतिहास आहे. असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कर्नाटकमध्ये जनाधार कोणाला आहे? १०४ जागा जिंकलेल्या भाजपला की ७८ जागा मिळवलेल्या काँग्रेसला, की ज्यांचा मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांचा मोठ्या फरकानं पराभव झाला त्या जेडीएसला, जे फक्त ३७ जागा जिंकू आणि काही ठिकाणी तर त्यांची डिपॉझिट्सही जप्त झाली आहेत.

हे समजण्याएवढे लोक शहाणे नक्कीच आहेत. 'लोकशाहीचा खून' त्यावेळेसच झाला, जेव्हा सत्तेसाठी हपापलेल्या काँग्रेसनं जेडीएसपुढे संधीसाधू ऑफर ठेवली, कर्नाटकच्या फायद्यासाठी नाही तर त्यांच्या स्वत:च्या स्वार्थासाठी, लाजीरवाणी गोष्ट. असं टीका करत अमित शहा यांनी काँग्रेसवर आणि प्रामुख्याने राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 17, 2018 12:43 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close