काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे 'टुकडे टुकडे गँग' - अरुण जेटली

काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे 'टुकडे टुकडे गँग' - अरुण जेटली

केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली आहे. या जाहीरनाम्यातले मुद्दे सुचवणारं राहुल गांधींचं सल्लागार मंडळ म्हणजे 'टुकडे टुकडे गँग' आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, २ एप्रिल : केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली आहे. या जाहीरनाम्यातले मुद्दे सुचवणारं राहुल गांधींचं सल्लागार मंडळ म्हणजे 'टुकडे टुकडे गँग' आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचा जाहीरनामा धोकादायक आहे आणि तो राबवणं शक्य नाही, अशी टीका त्यांनी केली. दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसने याआधीच ‘न्याय’ योजना जाहीर केली होती. तसंच रोजगारांवर भर आणि शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प जाहीर करण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. याला त्यांनी किसान बजेट असं म्हटलं आहे.

काँग्रेस ज्या ५ राज्यांत सत्तेत आहे तिथे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची नुसती आश्वासनं देण्यात आली पण प्रत्यक्षात काहीच झालं नाही, असा आरोप जेटली यांनी केला.

काँग्रेसने ईशान्य भारतातला ‘अफस्पा’ कायदा मागे घेण्याचीही घोषणा केली आहे. पण यामुळे देशविरोधी कारवायांना खतपाणी घातलं जाईल, अशीही टिप्पणी अरुण जेटलींनी केली. ‘अफस्पा’ म्हणजेच स्पेशल आर्म्ड फोर्सेस अक्ट हा कायदा ईशान्य भारत आणि काश्मीरमध्ये काही भागात लागू करण्यात आला आहे.या कायद्यानुसार लष्कराला विशेष अधिकार देण्यात आले आहेत.

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात काश्मिरी पंडितांचा उल्लेख केलेला नाही. या लोकांच्या वेदना समजून घेण्यात या पक्षाला अपयश आलं, अशी टीका अरुण जेटलींनी केली. काश्मीर प्रश्न हाताळताना नेहरू आणि गांधी घराण्याने अक्षम्य चुका केल्या आहेत, असंही ते म्हणाले.

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात शिक्षण आणि आरोग्यावर भर देण्यार असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या १९ जणांच्या सल्लागार मंडळाने हा जाहीरनामा बनवला आहे. या तज्ज्ञांमध्ये भालचंद्र मुणगेकर, सॅम पिट्रोडा, शशी थरुर यांच्यासारख्या तज्ज्ञांचा समावेश आहे.

======================================================================================================================================

SPECIAL REPORT: वाल्याचा वाल्मिकी होण्याचा राजकारणाचा मार्ग बंद!

First published: April 2, 2019, 5:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading