• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 'राजकारणात गेलात तर मी तुम्हाला सोडून जाईन', रघुराम राजन यांच्या पत्नीने दिला इशारा

'राजकारणात गेलात तर मी तुम्हाला सोडून जाईन', रघुराम राजन यांच्या पत्नीने दिला इशारा

तुम्ही जर राजकारणात गेलात तर मी तुम्हाला सोडून जाईन, अशी धमकी मला माझ्या पत्नीने दिली आहे, असं रघुराम राजन म्हणाले. 'मिंट' या बिझनेस पेपरला त्यांनी खास मुलाखत दिली.

 • Share this:
  मुंबई, 27 एप्रिल : आपण राजकारणात जाणार नाही, असं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलं आहे. 'मिंट' या बिझनेस पेपरला त्यांनी खास मुलाखत दिली. आपल्या पत्नीमुळे आपण राजकारणात जाणार नाही, असंही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. तुम्ही जर राजकारणात गेलात तर मी तुम्हाला सोडून जाईन, अशी धमकी मला माझ्या पत्नीने दिली आहे, असं रघुराम राजन म्हणाले. कोण आहेत रघुराम राजन यांच्या पत्नी? रघुराम राजन यांच्या पत्नी राधिका राजन या सुविद्य आहेत. त्यांनी आयआयटी दिल्लीमधून बीटेक केलं आहे. आयआयएम अहमदाबादमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि MIT सोलन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी पीएचडी केली आहे. देशातलं राजकारण हे तुमच्या शैलीला अनुकूल नाही का ? असं रघुराम राजन यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, 'असं काही नाही, राजकारण सगळीकडेच असंच झालं आहे. भाषणं देऊन मतं घेण्याचं काम मी करू शकत नाही.' रघुराम राजन नुकतेच चेन्नईमध्ये आले होते. तिथे मिंट या वृत्तपत्राने त्यांची मुलाखत घेतली. यातले काही प्रश्न आणि त्यावर त्यांचं उत्तर असं होतं... प्रश्न : संधी मिळाली तर तुम्ही भारतात याल, असं तुम्ही म्हणाला होतात, याचा अर्थ काय ? उत्तर : माझी देशाला गरज असेल तर मी नक्कीच देशाला मदत करेन. मला यात आनंदच आहे. माझ्याकडे काही लोक सल्ला मागतात याचं मला समाधान वाटतं. प्रश्न : काँग्रेस जर सत्तेत आलं तर तुम्ही मंत्री व्हाल, असं बोललं जातं. त्यावर तुमचं काय मत आहे ? उत्तर : माझं काम हे प्रामुख्याने शिकवण्याचं आहे. मला हेच काम आवडतं. मी नुकतंच 'थर्ड पिलर' नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. मी जिथे आहे तिथे खुश आहे. प्रश्न : नवं सरकार आल्यानंतर कशा प्रकारचे बदल आवश्यक आहेत ? उत्तर : जेव्हा कोणतंही नवं सरकार येतं तेव्हा त्या सरकारने सुधारणांचा विचार केला पाहिजे. जुनं सरकार पुन्हा सत्तेत आलं किंवा नवं सरकार आलं तरी त्यांनी सुधारणांना प्राधान्य द्यायला हवं. प्रश्न : बेरोजगारीची समस्या भारतच नाही तर जगभरात आहे. आपल्या देशाची आर्थिक वाढ करण्यासाठी काय उपाय करायला हवेत ? यावर आपल्या विद्यापीठांमध्ये संशोधन सुरू आहे का ? उत्तर : मला असं कुठे दिसत नाही. आपण चीनने सोडलेल्या नोकऱ्या मिळवू शकत नाही का ? गुंतवणूकदार व्हिएतनाम आणि बांगलादेशमध्ये जात आहेत. त्यामुळे सगळ्याच देशातली सरकारं या आव्हानाला सामोरं जात आहेत. ================================================================================= VIDEO: राज ठाकरेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना भाजपचं 'कॉपीपेस्ट'
  First published: