• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • भारताच्या ७ टक्के वाढीवर रघुराम राजन यांना शंका, CNBC-TV18 ला खास मुलाखत

भारताच्या ७ टक्के वाढीवर रघुराम राजन यांना शंका, CNBC-TV18 ला खास मुलाखत

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताच्या ७ टक्के वाढीवर शंका उपस्थित केली आहे. भारताच्या विकास दराची नीट आकडेवारी स्पष्ट करण्यासाठी नामांकित अर्थतज्ज्ञांची नियुक्ती करायला पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 26 मार्च : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताच्या ७ टक्के वाढीवर शंका उपस्थित केली आहे. भारताच्या विकास दराची नीट आकडेवारी स्पष्ट करण्यासाठी नामांकित अर्थतज्ज्ञांची नियुक्ती करायला पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. CNBC-TV18 ला दिलेल्या खास मुलाखतीत रघुराम राजन यांनी हे विचार व्यक्त केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी राहुल गांधींनी जाहीर केलेल्या किमान उत्पन्न हमी योजनेवरही त्यांनी या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. भारतामध्ये गरीब लोक किती आहेत याबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जातात. त्यामुळेच ही योजना जर गरिबातल्या गरिब लोकांपर्यंत पोहोचणार असेल तरच या योजनेचं यश अवलंबून आहे, असं ते म्हणाले. तुम्ही जर अर्थमंत्री असाल तर कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्याल, असा प्रश्नही रघुराम राजन यांना विचारण्यात आला. त्यावर भूसंपादन, बँकांच्या व्यवहारात सुधारणा आणि शेतीशी संबंधित सुधारणांना मी प्राधान्य दिलं असतं, असं ते म्हणाले. मी नक्कीच अल्पकालीन योजनांवर लक्ष दिलं असतं, जे प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत ते प्रकल्प सुरळित पार पडावेत, यासाठी मी प्रयत्न केले असते.असं त्यांनी सांगितलं. बँकांचे व्यवहार नीट चालावेत यासाठीही मी विशेष प्रयत्न केले असते, असं सांगत शेतीमधल्या सुधारणा आणि भूसंपादन यावर विशेष लक्ष देण्याची गरजही त्यांनी नमूद केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना रघुराम राजन यांनी बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणांचा आग्रह धरला होता. त्यानुसार, याही मुलाखतीत त्यांनी बँकांच्या स्वच्छ व्यवहारावर भर दिला. अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी 'थर्ड पिलर' हे नवं पुस्तक लिहिलं आहे. आपली अर्थव्यवस्था, समाज आणि राजकीय वर्ग यांच्यातल्या संबंधांचं विश्लेषण त्यांनी या पुस्तकात केलं आहे. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- VIDEO: ...आणि सुषमा स्वराज नितीन गडकरींना म्हणाल्या 'विजयी भव'
  First published: