मराठी बातम्या /बातम्या /देश /छत्तीसगडच्या शाळांमध्ये प्रतिज्ञेसोबतच विद्यार्थी म्हणणार 'रघुपती राघव राजाराम' अन् 'वैष्णव जन'

छत्तीसगडच्या शाळांमध्ये प्रतिज्ञेसोबतच विद्यार्थी म्हणणार 'रघुपती राघव राजाराम' अन् 'वैष्णव जन'

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी शाळांमध्ये गांधीजींची भजनं म्हणून घेण्याचा निर्णय तर घेतला आहे.

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी शाळांमध्ये गांधीजींची भजनं म्हणून घेण्याचा निर्णय तर घेतला आहे.

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी शाळांमध्ये गांधीजींची भजनं म्हणून घेण्याचा निर्णय तर घेतला आहे.

    नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : शालेय जीवनात मुलांवर जे संस्कार होतात ते आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतात, असं म्हटलं जातं. त्यामुळे शाळकरी मुलांना शक्य त्या चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात. यासाठी जवळपास सर्वच शाळांमध्ये सकाळी मुलांकडून राष्ट्रगीत, प्रतिज्ञा आणि विविध प्रार्थना म्हणून घेतल्या जातात. त्यांच्या अंगी नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, देश प्रेम, बंधुत्व यासारख्या बाबी रुजवणं, हा या मगचा हेतू असतो. आपल्या राज्यातील मुलांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी (Mahatma Gandhi) यांनी सांगितलेली मूल्ये रुजावीत, यासाठी छत्तीसगडचे (Chhattisgarh) मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

    या निर्णयामुळं इथून पुढं छत्तीसगडमधील सर्व शाळांमध्ये महात्मा गांधींच्या भजनांचे स्वर आळवले जाणार आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यातील शाळांबाबत काही नवीन निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयानुसार आता छत्तीसगडमधील शाळांमध्ये (Chhattisgarh School) राष्ट्रगीतासोबत महात्मा गांधीजींची दोन प्रसिद्ध भजनं म्हटली जाणार आहेत.

    मुलांकडून 'रघुपती राघव राजा राम' आणि 'वैष्णव जन तो तेने कहिए' ही दोन भजनं नियमित म्हणून घ्यावीत, अशा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. शाळकरी मुलांमध्ये राष्ट्रीय एकता व एकात्मतेची भावना दृढ व्हावी, यासाठी छत्तीसगड सरकारनं हा निर्णय घेतल्याचं वृत्त हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

    वाचा : Career Tips: 'या' तीन क्षेत्रांमध्ये आहेत करिअर करण्याची सर्वात मोठी संधी; जाणून घ्या डिटेल्स

    जगभरातील सामाजिक आणि राजकीय वातावरणात झपाट्यानं बदल होत आहेत. अशा वातावरणात गांधीजींच्या आवडत्या भजनांची आणि विचारांची प्रासंगिकता वाढली आहे. गांधीजींच्या भजनांचं सार आत्मसात करून ते आपल्या जीवनात अंगीकारलं पाहिजे. माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी आणि माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल या दोन महान व्यक्तींनीसुद्धा महात्मा गांधींच्या मूल्यांचा स्वीकार केला होता.

    गांधीजींची शिकवण, ही दोघांमध्ये असलेली सर्वात मोठी समानता होती, असे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले. राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक एकता या गोष्टींवर भारताचं मूळ स्वरूप आधारेलं आहे. गरजू, पीडित, गरीब व्यक्तींच्या दुःखाची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. अशा लोकांना सर्वतोपरी मदत करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, असे देखील मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले असं या वृत्तात म्हटलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Chattisgarh, Mahatma gandhi, School