रघुराम राजन यांनी 'आप'ची राज्यसभेची ऑफर नाकारली

रघुराम राजन यांनी 'आप'ची राज्यसभेची ऑफर नाकारली

मला अमेरिकेतल्या शिकागोमध्ये प्राध्यापकी करण्यात जास्त रस आहे, आणि ते काम मी पुढचा काही काळ थांबवणार नाही, असं छोटंसं निवेदन राजन यांनी प्रसिद्ध केलंय'

  • Share this:

दिल्ली, 09 नोव्हेंबर: रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी राज्यसभेची ऑफर नाकारली आहे. आम आदमी पार्टीनं त्यांना ही ऑफर दिली होती.

रघुराम राजम हे एक नामवंत अर्थतज्ज्ञ आहेत. रूपयाची घसरण चालू असताना रिझर्व बॅंकेला त्यांनी मोठ्या प्रमाणात सावरलं होतं. राजन यांना आम आदमी पक्षाने दिल्लीतून राज्यसभेवर जायची ऑफर दिली. पण ती त्यांनी स्वीकारलेली नाही. 'मला अमेरिकेतल्या शिकागोमध्ये प्राध्यापकी करण्यात जास्त रस आहे, आणि ते काम मी पुढचा काही काळ थांबवणार नाही, असं छोटंसं निवेदन राजन यांनी प्रसिद्ध केलंय'. दिल्लीतून राज्यसभेवर 3 खासदार जातात. येत्या जानेवारीत दिल्लीचे लोकप्रतिनिधी राज्यसभेसाठी मतदान करतील. दिल्लीत सध्या आपच्या 66 जागा असल्यानं राज्यसभेवर कोण जाणार हे ठरवणं 'आप'च्याच हातात आहे.

First published: November 9, 2017, 10:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading