राफेल वाद पेटत असतानाच गोव्यात पर्रिकरांना भेटले राहुल गांधी

राफेल वाद पेटत असतानाच गोव्यात पर्रिकरांना भेटले राहुल गांधी

पर्रिकरांच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी ते पोहचले असल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

पणजी, 29 जानेवारी : राफेल डीलवर समोर आलेल्या एका ऑडिऑ क्लीपवरून सुरू असलेला वाद ताजा असतानाच राहुल गांधी यांनी मंगळवारी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्द्यावर चर्चा केली असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

तर एककीकडे, राहुल गांधी हे त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पर्रिकरांच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी ते पोहचले असल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे.

मनोहर पर्रिकरांसोबतची ही खासगी बैठक होती असं म्हणत राहुल गांधी यांनी एक ट्वीट केलं. 'आज सकाळी मी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. ते लवकर बरे व्होओ अशी प्राथर्ना आहे. हा माझा खासगी दौरा होता' असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहलं आहे.

राहुल गांधींनी पुढे लिहलं की, आज ते कोचीमध्ये केरळच्या बूथ कमिटी सदस्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी ते फेसबुकवर लाईव्ह असणार आहेत.

एका दिवसा आधीच राहुल गांधी यांनी ट्वीट केलं होतं की, 'राफेलवर ऑडिओ क्लीप रिलीज होऊन आता 30 दिवस उलटले. पण तरीदेखील कोणतीही तक्रार किंवा चौकशी करण्यात आलेली नाही. गोव्याच्या मंत्र्यांची ती ऑडिओ क्लीप होती. पण कारवाई झाली नाही.'

VIDEO : जॉर्ज फर्नांडिस हे भारतातील सर्वोत्तम नेत्यांपैकी एक - मोदी

First published: January 29, 2019, 1:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading