राफेल : भारतातच आहे या नावाचं गाव पण गावकऱ्यांची अजब मागणी

राफेल : भारतातच आहे या नावाचं गाव पण गावकऱ्यांची अजब मागणी

राफेल हा शब्द गेले कित्येक दिवस वादग्रस्त बनला आहे. राफेल विमानांच्या खरेदीवरून केंद्र सरकारवर अनेक आरोप झाले. त्यामुळे राफेल असं नुसतं म्हटलं की प्रत्येकाला हा वाद आठवतो.पण राफेल हे फक्त विमानांचंच नाही तर एका गावाचंही नाव आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल : राफेल हा शब्द गेले कित्येक दिवस वादग्रस्त बनला आहे. राफेल विमानांच्या खरेदीवरून केंद्र सरकारवर अनेक आरोप झाले. त्यामुळे राफेल असं नुसतं म्हटलं की प्रत्येकाला हा वाद आठवतो.पण राफेल हे फक्त विमानांचंच नाही तर एका गावाचंही नाव आहे हे फार कमीजणांना माहीत आहे.

राफेल हा फ्रेंच शब्द आहे पण हे गाव फ्रान्समध्ये नाही तर ते आहे छत्तीसगडमध्ये. याच राफेल गावात 18 एप्रिलला मतदानही होतं आहे. या गावातल्या सुमारे 200 कुटुंबातले मतदार हे मतदान करतील.

गावकऱ्यांवर विनोद

राफेल या नावामुळे हे गाव चर्चेत आलं, त्याला प्रसिद्धी मिळाली पण तिथले गावकरी मात्र यावर खुश नाहीत. गावकऱ्यांना त्यांच्या गावाचं नाव बदलायचं आहे. राफेल हा शब्द आता नकारात्मक बनला आहे. त्यामुळे या गावावर आणि गावातल्या लोकांवर बरेच विनोद केले जातात. इथले गावकरी या नकारात्मक प्रसिद्धीला कंटाळले आहेत. त्यामुळेच त्यांनी हे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

हे गावकरी एवढं ठरवूनच थांबले नाहीत तर त्यांनी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग बघेल यांचीही भेट घेण्याचाही प्रयत्न केला. मुख्यमंत्री त्यांना भेटले तर नाहीत पण गावाचं नाव बदलण्यासाठी त्यांनी अर्जविनंत्या मात्र सुरूच ठेवल्या आहेत. या गावातले 83 वर्षांचे धरम सिंग यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला याबद्दल सांगितलं.

मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न

'राफेल या नावामुळे आमच्या गावाकडे सगळ्यांचं लक्ष जातं. या नावावरून वादच सुरू आहेत पण कुणालाही याच्याशी देणंघेणं नाही. राज्याच्या बाहेर या गावाबद्दल कुणाला माहीतही नाही', असं धरम सिंग यांचं म्हणणं होतं.

या गावाचं नाव राफेल का पडलं याबदद्ल त्यांना काहीही माहिती नाही. ते म्हणतात, 'कित्येक दशकं आमच्या गावाचं हेच नाव आहे. 2000 साली जेव्हा छत्तीसगडची स्थापना झाली त्याच्या आधीपासूनच या गावाचं हे नाव पडलं पण यामागे काय कारण आहे हे मात्र आम्हाला माहिती नाही.'

मेहसामुंड मतदारसंघ

राफेल हे गाव मेहसामुंड या मतदारसंघात येतं. इथून भाजपचे चंदुलाल साहू हे विद्यमान खासदार पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे धनेंद्र साहू निवडणूक लढवतायत. जो कोणी निवडणुकीत निवडून येईल त्याने आमच्या गावाचं नाव मात्र तेवढं बदलावं, असं मतदार म्हणतात.

गावाबद्दल संशय ?

काँग्रेसचे उमेदवार धनेंद्र साहू यांना चंदुलाल साहू यांच्यावर टीका करण्यासाठी या गावाच्या नावामुळे आयताच मुद्दा मिळालाय. त्या राफेल विमानांच्या खरेदी व्यवहार संशयास्पद असला तरी आमच्या गावामध्ये आमच्या गावाकडे संशयाने बघु नका,असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

या राफेल गावातले शेतकरी शेतीसाठी पावसावरच अवलंबून आहेत. इथे पाणीपुरवठा, शौचालयं यासारख्या मूलभूत सुविधाही नाहीत. पण नावावरून मात्र वाद सुरू झाला आहे.

राफेलचा वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने प्रत्येक राफेल विमानांची किंमत वाढवून उद्योगपती अनिल अंबानींना फायदा मिळवून दिला, असा काँग्रेस आणि विरोधकांचा आरोप आहे. केंद्र सरकार आणि अनिल अंबानींनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

====================================================================================================================================================================

VIDEO: शशी थरूर यांना दुखापत; कपाळाला सहा टाके


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: rafale
First Published: Apr 15, 2019 05:14 PM IST

ताज्या बातम्या