Home /News /national /

हीच ती वेळ! अखेर 'राफेल' भारतीय भूमीवर लँड झाले, पाहा हा VIDEO

हीच ती वेळ! अखेर 'राफेल' भारतीय भूमीवर लँड झाले, पाहा हा VIDEO

हरयाणामधील अंबाला हवाई दलाच्या बेसवर राफेल विमानाचे यशस्वी लँडिंग झाले आहे.

    अंबाला, 29 जुलै : आजचा दिवस भारतीय हवाई दलासह संपूर्ण भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, भारतीय सैन्याची ताकद आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी खास असे सुपर फायटर राफेल लढाऊ विमानाची पहिली तुकडी भारतात दाखल झाली आहे. हरयाणामधील अंबाला हवाई दलाच्या बेसवर राफेल विमानाचे यशस्वी लँडिंग झाले आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिडिओ ट्वीट करून भारतीयांचे आणि हवाई दलाचे अभिनंदन केले आहे. त्याआधी  राफेल फायर जेटचं भारतीय आकाशातच वायूदलाने जंगी स्वागत केले होतं. 2 सुखोई MIK 30 फायटर जेटने 5 राफेल फायटर जेटना एस्कॉर्ट करत अंबाला एअर बेसकडे रवाना झाले. आकाशातच हा थरार सोहळा रंगला होता. जेव्हा पाच राफेल फायटर विमानानं भारताच्या दिशेनं येत होती तेव्हा दोन सुखोई विमाननं त्यांच्या ताफ्यात दाखल झाली. त्यानंतर पुढेही विमानं अबाला एअरबेसवर पोहोचली. तर दुसरीकडे यूएईच्या अल धफ्रा बेसवरुन उड्डाण केल्यानंतर राफेलच्या तुकडीने पश्चिम अरबी सागरात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या INS कोलकात्ता या युद्धनौकेतील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर या युद्धनौकेनंही राफेल विमानाचं स्वागत केलं. राफेल विमानाची पहिली तुकडी  अंबाला एअरबेसवर दाखल झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अंबाला एअरबेसजवळील तीन किमी अंतरावर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती तसंच ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली होती. राफेल विमानांनी काल (२८ जुलै) फ्रान्समधून भारताच्या दिशेनं झेप घेतली होती.  तीन लढाऊ तर दोन प्रशिक्षित अशा 5 राफेल विमानांची पहिली तुकडी आज भारतात पोहोचला आहे.  27 जुलै रोजी फ्रान्सच्या मेरिग्नाक एअरबेसवरून ही 5 विमान भारताच्या दिशेनं रवाना झाली होती. ...जेव्हा राफेल भारतात पोहोचले, प्रत्येक भारतीयांची मान उंचावणारे PHOTOS सप्टेंबर 2016 रोजीमध्ये फ्रान्सबरोबर झालेल्या करारात भारताने सुमारे 58 हजार कोटींमध्ये 36 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी कऱण्यात आली. त्यापैकी 30 लढाऊ विमानं तर 6 प्रशिक्षण देणारी विमानं आहेत. राफेलची पहिल्या 5 विमानांची तुकडी बुधवारी भारताच्या ताफ्यात दाखल होत आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंत भारताला राफेलची 36 विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होतील. हवेतूनच जमिनीवर 60 किलोमीटरपर्यंत अचूक निशाणा साधणार्‍या या विमानांमुळे भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात मोठी भर पडणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Rafale

    पुढील बातम्या