'राफेल विमानं असती तर एअर स्ट्राइक प्रभावी झाला असता'- बी.एस. धनोआ

'राफेल विमानं असती तर एअर स्ट्राइक प्रभावी झाला असता'-  बी.एस. धनोआ

राफेल विमानांच्या खरेदीवरून काँग्रसने भाजपला लक्ष्य केलं आहे पण याच राफेल विमानांबद्दल हवाईदलप्रमुखांचं एक महत्त्वाचं वक्तव्य आलं आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात जर ही विमानं असती तर हा हल्ला आणखी प्रभावी झाला असता, असं हवाई दलप्रमुख बी. एस. धानोआ यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल : राफेल विमानांच्या खरेदीवरून काँग्रसने भाजपला लक्ष्य केलं आहे पण याच राफेल विमानांबद्दल हवाईदलप्रमुखांचं एक महत्त्वाचं वक्तव्य आलं आहे.

भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात जर ही विमानं असती तर हा हल्ला आणखी प्रभावी झाला असता, असं हवाई दलप्रमुख बी. एस. धानोआ यांनी म्हटलं आहे.

'मिराज'ची कमाल

काश्मीरमधल्या पुलवामा मध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमधल्या बालाकोटच्या दहशतवादी तळावर हल्ला केला होता.

या हवाई हल्ल्यात मिराज विमानं वापरण्यात आली होती. पण त्याच वेळी वायुदलाकडे राफेल विमानं असती तर दहशतवादी हल्ल्याचे परिणाम वेगळे झाले असते, असं हवाईदलप्रमुखांचं म्हणणं आहे. राफेल विमानं याआधीच भारताच्या ताफ्यात दाखल झाली असती तर या हल्ल्यात त्यांचा उपयोग झाला असता, अशी टिप्पणी त्यांनी केली.

हवाई दलाची शान

भारताच्या हवाई दलात सध्या मिग - 2, मिग बायसन आणि मिराज - 2000 ही विमानं आहेत. ही विमानं भारताच्या हवाई दलाची शान आहेत. यामध्ये राफेल विमानांचीही भर पडायला हवी, असं मत हवाई दलप्रमुख बी. एस. धानोआ यांनी व्यक्त केलं.

काँग्रेसचा आरोप

राफेल विमानांचा खरेदी व्यवहार संशयास्पद आहे, असा काँग्रेसचा आरोप आहे. या प्रत्येक विमानाची किंमत सरकारने चढ्या दराने ठरवली आणि अनिल अंबानींचा फायदा करून दिला, असंही काँग्रेसचं म्हणणं आहे.

केंद्र सरकार आणि अनिल अंबानी यांनी मात्र राफेलबद्दल झालेले सगळे आरोप फेटाळले आहेत.

या व्यवहारात काहीही संशयास्पद नाही, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. पण यासंबंधीची नव्याने आलेली कागदपत्रं पडताळून मग निर्णय देऊ, असं कोर्टाने म्हटलं होतं.

===================================================================================================================================================================

VIDEO : ...आणि भाजपच्या जाहिरातीतल्या 'पोस्टर बाॅय'ला राज ठाकरेंनी व्यासपीठावरच बोलावलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 09:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading