फ्रान्सने भारताकडे सोपवली राफेल विमानं, राजनाथ सिंह यांनी विमानाची केली पूजा

फ्रान्सने भारताकडे सोपवली राफेल विमानं, राजनाथ सिंह यांनी विमानाची केली पूजा

ज्या राफेल विमानांची गेलं वर्षभर जोरदार चर्चा होती त्या विमानांपैकी पहिलं विमान फ्रान्सने भारताकडे सोपवलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सच्या दौऱ्यात पहिल्या राफेल विमानाची पूजा केली.

  • Share this:

पॅरिस (फ्रान्स), 8 ऑक्टोबर : ज्या राफेल विमानांची गेलं वर्षभर जोरदार चर्चा होती त्या विमानांपैकी पहिलं विमान फ्रान्सने भारताकडे सोपवलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सच्या दौऱ्यात पहिल्या राफेल विमानाची पूजा केली. दसऱ्याला शस्त्रपूजा केली जाते. त्याचप्रमाणे या विमानाचीही यथासांग पूजा करण्यात आली.

राफेल विमानांमुळे भारताच्या वायुदलाचं सामर्थ्य वाढेल, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. याआधी राजनाथ सिंह मॅरीग्नेकमध्ये दसॉ एव्हिएशन फॅक्टरीमध्ये गेले आणि त्यांनी राफेल विमानांची पाहणी केली.फ्रान्सने भारताला 36 राफेल विमानं देण्याचा करार केला आहे. आज भारतीय हवाई दलाचा स्थापना दिवस आहे. त्याचबरोबर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही राफेल विमानं भारताच्या ताफ्यात येणार आहेत.

2016 मध्ये झाला करार

भारताने फ्रान्सशी अशी 36 राफेल विमानं खरेदी करण्याचा करार केला होता. या विमानांची एकूण किंमत 59 हजार कोटी रुपये आहे. राफेल विमानांपैकी पहिली 4 विमानं पुढच्या वर्षी मे महिन्यापर्यंत भारतात येतील.पुढच्या टप्प्यात सप्टेंबर 2022 पर्यंत सगळी 36 राफेल विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात येणार आहेत. यासाठी वैमानिकांचं प्रशिक्षण आणि सगळी तयारी करण्यात येत आहे.

======================================================================================================

VIDEO : 'राफेल'च्या चाकाखाली लिंबू आणि वाहिले नारळ, राजनाथ सिंहांनी केली फ्रान्समध्ये पूजा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2019 07:03 PM IST

ताज्या बातम्या