घराणेशाहीला वाचवण्यासाठी किती खोटं बोलणार? जेटलींचा राहुल गांधींवर निशाणा

घराणेशाहीला वाचवण्यासाठी किती खोटं बोलणार? जेटलींचा राहुल गांधींवर निशाणा

राफेल करारावरून आता अरूण जेटली यांनी ब्लॉगमधून राहुल गांधी यांना लक्ष्य केलं आहे.

  • Share this:

दिल्ली, 12 फेब्रुवारी : सध्या देशात राफेल प्रकरणावरून 'आरोपांची उड्डाणे' होताना दिसत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी ईमेलचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. मेलच्या आधारे नरेंद्र मोदी यांनी उद्योगपतींच्या भल्यासाठी करार केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्याला आता केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी फेसबुकवर ब्लॉग लिहित जोरदार उत्तर दिलं आहे. शिवाय, राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली आहे.

किती खोटं बोलणार?

'बुडत्या घराणेशाहीला वाचवण्यासाठी राहुल गांधी आणखी किती खोटं बोलणार?' अशा शब्दात अरूण जेटली यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. खोट्याचा आधार घेत राजकारण करणारे लोकशाहीमध्ये टिकत नाहीत असा टोला देखील यावेळी जेटली यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता भारतात देखील असंच होईल असं देखील जेटली यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

'काँग्रेसमधील एकाही नेत्यामध्ये राहुल गांधी यांना योग्य आणि अयोग्य काय याबद्दल सांगण्याची हिंमत' नसल्याचं अरूण जेटली यांनी म्हटलं आहे. 'नोकर मानसिकते'ची सुरूवात 1970मध्ये झाली. यामध्ये केवळ घराणेशाहीचाच उदोउदो केला जातो. नेता चुकल्यानंतर देखील त्यांच्या भोवतीचे लोक काहीही न बोलता नेत्याच्या वागण्याला समर्थन देतात, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

=======================

Video - सलाम भारतीय जवानांना! हा VIDEO पाहून तुमचा ऊर अभिमानाने भरुन येईल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 09:53 PM IST

ताज्या बातम्या