चौकीदार चोर है : राहुल गांधींची माफी पुरेशी नाही; पुन्हा होणार सुनावणी

राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा नोटीस पाठवली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 23, 2019 01:23 PM IST

चौकीदार चोर है : राहुल गांधींची माफी पुरेशी नाही; पुन्हा होणार सुनावणी

नवी दिल्ली, 23 एप्रिल : राफेल प्रकरणामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोर्टाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 'चौकीदार चोर है' म्हणत हल्लाबोल चढवला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधींना कोर्टाचा अवमान प्रकरणी नोटीस पाठवत स्पष्टीकरणाची मागणी केली. यावर सोमवारी ( 23 एप्रिल ) राहुल गांधी यांनी आपल्याकडून चुक झाल्याचं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयात दिलं. पण, राहुल गांधी यांच्या स्पष्टीकरणावर न्यायालय समाधानी नाही त्यामुळे या प्रकरणात पुढील सुनावणी ही 30 एप्रिलला होणार आहे.Loading...


साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीविरोधात मुंबईच्या NIA कोर्टात याचिका


काय आहे प्रकरण?

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राफेल प्रकरणात कोर्टाच्या निर्णयाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौकीदार चोर है अशी टीका केली होती. त्यावर मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर आता सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली होती. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवत 22 एप्रिलपर्यंत आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याबाबत खुलासा केला होता. 'निवडणुकीच्या धामधुमीत मी ते वक्तव्य केलं होतं. त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो,' असं स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिलं होतं.


देशात भाजपची सत्ता येणार? काय म्हणाले संजय राऊत


नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

दरम्यान, राफेल प्रकरणामध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. आपल्या प्रचारसभांमधून देखील राहुल गांधी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. शि्वाय, अनिल अंबानी यांना नरेंद्र मोदी यांनी हजारो कोटींचा फायदा करून दिला असा आरोप देखील राहुल गांधी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2019 01:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...