राफेलचा वाद सुरूच, सुप्रीम कोर्टाने केंद्राला पाठवली नोटीस

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांचं मतदान झालं तरी राफेलचा मुद्दा अजूनही सुरूच आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकांवरून कोर्टाने सरकारला नोटीस पाठवली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 03:48 PM IST

राफेलचा वाद सुरूच, सुप्रीम कोर्टाने केंद्राला पाठवली नोटीस

नवी दिल्ली, 30 एप्रिल :  लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांचं मतदान झालं तरी राफेलचा मुद्दा अजूनही सुरूच आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकांवरून कोर्टाने सरकारला नोटीस पाठवली आहे.

या नोटिशीवर उत्तर देण्यासाठी अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांनी सरकारला 4 मे पर्यंतची मुदत दिली आहे.

राहुल गांधींचे आरोप

राफेल या लढाऊ विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा भ्रष्टाचार केला, असा राहुल गांधींचा आरोप आहे. 'राफेल विमानांची मोदी सरकारने अचानक किंमत वाढवली. तसंच भारतातील अनुभवी किंपनी 'एचएल'ला डावलून राफेल करारामध्ये उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीचा समावेश करण्यात आला. हे सर्व अनिल अंबानींच्या वैयक्तिक फायद्यासाठी केलं गेलं,असंही राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

राफेलच्या आरोपांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना उत्तर दिलं. वडिलांच्या बोफोर्स प्रकरणाचा कलंक धुवून काढण्यासाठीच राहुल गांधी राफेलवरून आरोप करत आहेत, असं मोदी म्हणाले.

Loading...

कागदपत्रांची चोरी

दरम्यान, संरक्षण मंत्रालयातून राफेल कराराबाबतची महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत किंवा अनधिकृतपणे हाताळण्यात आली आहेत, अशी धक्कादायक माहिती महाधिवक्ता के.के वेणूगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात दिली होती. महाधिवक्त्यांच्या या माहितीने मोठी खळबळ उडाली होती.

संरक्षणाबाबतची अशी गुप्त कागदपत्रं समोर आणणं हा गुन्हा आहे. त्यामुळे याबाबतचा तपास सुरू आहे. हे एक संवेदनशील प्रकरण आहे,' असं के.के वेणूगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात म्हटलं होतं.

या कागदपत्रांच्या चोरीवरूनही उलटसुलट वक्तव्यं झाली आणि वाद निर्माण झाला. आता या याचिकांवर सरकार कोर्टाला काय उत्तर देतं हे पाहावं लागेल.

===========================================================================

VIDEO अक्षरमंत्र भाग 18 : असं काढा सुंदर अक्षर; आजचे शब्द - ऋ, प्र, श्री, द्यबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 03:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...