'चौकिदार चोर है' आणि राफेल प्रकरणाची सुनावणी 10 मे पर्यंत पुढे

राफेल प्रकरणातल्या याचिकांवरची सुनावणी सुप्रीम कोर्टाने 10 मे पर्यंत पुढे ढकलली आहे. राफेल प्रकरणी राहुल गांधी यांनी केलेल्या कोर्टाच्या अवमानाबदद्लची सुनावणीही पुढे गेली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 6, 2019 04:34 PM IST

'चौकिदार चोर है' आणि राफेल प्रकरणाची सुनावणी 10 मे पर्यंत पुढे

नवी दिल्ली, 6 मे : राफेल प्रकरणातल्या याचिकांवरची सुनावणी सुप्रीम कोर्टाने 10 मे पर्यंत पुढे ढकलली आहे. राफेल प्रकरणी राहुल गांधी यांनी केलेल्या कोर्टाच्या अवमानाबदद्लची सुनावणीही पुढे गेली आहे.

सुप्रीम कोर्ट गोंधळात

हे दोन खटले वेगवेगळे केल्यामुळे आम्हीच काहिसे गोंधळात पडलो आहोत, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटलं आहे. यामुळेच या दोन्ही खटल्यांमध्ये 10 मे ला सुनावणी होईल, असंही त्यांनी सांगितलं.

राफेल प्रकरणी सुनावणीच्या वेळी चौकिदार चोर है असं कोर्टाने म्हटलं, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. त्यावर भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली होती.

कोर्टाचा अवमान याचिका

Loading...

या प्रकरणाची सुनावणीही सोमवारी होणं अपेक्षित होतं. पण राफेल प्रकरणातल्या याचिका आणि राहुल गांधींचं कोर्टाचा अवमान प्रकरण हे दोन्ही वेगवेगळं केल्यामुळे ही सुनावणी होऊ शकली नाही. आता ही एकत्र सुनावणी 10 मे ला घेण्यात येणार आहे.

या दोन्ही प्रकरणांची सुनावणी एकत्र होईल असं कोर्टाने आदेशात म्हटलं होतं तरीसुद्धा राफेल प्रकरणातल्या याचिकांची सुनावणी आज आणि राहुल गांधींचं कोर्टाचा अवमान प्रकरण 10 तारखेला, असं कसं झालं, असा सवालही रंजन गोगोई यांनी विचारला.

लेखी माफी हवी

चौकिदार चोर है या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी कोर्टाची माफी मागितली पण ही माफी लेखी स्वरूपात देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. आता 10 मे ला कोर्टाच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी यावर सुनावणी होईल.

राफेल प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी फेरविचार याचिका दाखल केली आहे. राफेल विमानांच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राफेलबद्दलच्या या याचिकेला केंद्र सरकारने आक्षेप घेतला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या आणि अपुऱ्या कागदपत्रांच्या आधारे अशा याचिका दाखल करणं अयोग्य असल्याचं केंद्राचं मत आहे.

====================================================================================

VIDEO : मोदींची जहरी टीका; राहुल, प्रियांकाने केला पलटवार.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 04:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...