राफेलबाबतच्या निर्णयावर पुनर्विचार होणार? सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता

राफेलबाबतच्या निर्णयावर पुनर्विचार होणार? सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता

राफेल प्रकरणात डिसेंबरमध्ये झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला क्लीन चिट दिली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 मार्च : राफेल करारावर आलेल्या निर्णयात संशोधन करण्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. तसंच पुनर्विचार याचिकेवरही सुनावणी होऊ शकते.

राफेल प्रकरणात डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला क्लीन चिट दिली होती. त्यानंतर कोर्टाने दिलेल्या निकालामधील कॅगच्या रिपोर्टबाबतच्या भागात संशोधन करण्याबाबत केंद्र सरकारकडून याचिका दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, राफेल खरेदीवर संशय घेणं चुकीचं आहे, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने राफेल कराराबाबतच्या सर्व याचिका फेटाळल्या होत्या. त्यामुळे मोदी सरकारला याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला. राफेलवरून सरकारला संशयाच्या भोवऱ्यात उभं करणाऱ्या विरोधकांना हा मोठा झटका होता.

काय होता आरोप?

राफेल कराराची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, यासाठी अ‍ॅड. विनीत ढांडा यांनी याचिका दाखल केली होती. तसंच सरकारवर विविध आरोप करत या कराराविरोधात इतरही काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

राफेल मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याप्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

काय आहे राहुल गांधींचा आरोप?

राफेल या लढाऊ विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा भ्रष्टाचार केला, असा राहुल गांधींचा आरोप आहे. 'राफेल विमानांची मोदी सरकारने अचानक किंमत वाढवली. तसंच भारतातील अनुभवी कंपनी 'एचएएल'ला डावलून राफेल करारामध्ये उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीचा समावेश करण्यात आला. हे सर्व अनिल अंबानींच्या वैयक्तिक फायद्यासाठी केलं गेलं,' असा राहुल गांधींचा आरोप आहे.

मोदींचं उत्तर

आमचे सरकारच पहिले राफेल विमान उडवणार, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच म्हटलं आहे. राफेल विमान प्रकरणावरुन काँग्रेसला टार्गेट करताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, ही लोक वर्षानुवर्षे राफेल विमानांच्या खरेदी करारावरच अडून बसले होते. जेव्हा सरकार सत्तेतून जाण्याची वेळ आली तेव्हा संबंधित करार बासनात गुंडाळला. मग आमचे सरकार आहे आणि दीड वर्षाच्या आतच करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि काही महिन्यांतच देशाच्या शत्रूंना धक्के देण्यासाठी पहिले राफेल विमान आकाशात झेपावणार आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

VIDEO : बायको उद्या राष्ट्रवादीकडून लढली तरी, प्रचार सेनेच्या उमेदवाराचाच - चंद्रकांत पाटील

First published: March 5, 2019, 7:03 AM IST

ताज्या बातम्या