Video: 'आए थे 2014 में मां गंगा के लाल बनके, जाओगे 2019 में राफेल के दलाल बनके'

एका प्रचार सभेत सिद्धू यांनी राफेल करारावरून पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला.

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 05:21 PM IST

Video: 'आए थे 2014 में मां गंगा के लाल बनके, जाओगे 2019 में राफेल के दलाल बनके'

नवी दिल्ली, 18 एप्रिल: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहेत. यात काही नेत्यांनी वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधाने देखील केली आहेत. तर काही नेते सरकारच्या चुकांवर नेमके बोट ठेवत टीका करत आहेत. अशीच एक टीका काँग्रेसचे नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी केली आहे. एका प्रचार सभेत सिद्धू यांनी राफेल करारावरून पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. सिद्धू यांनी केलेली ही टीका आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

हे देखील वाचा: 'ही कुठली देशभक्ती? रिकामं पोट आणि मोदी म्हणतात योगा करा'सिद्धू यांनी एका प्रचार सभेतील व्हिडिओ ट्वीट केला आहे. ते म्हणतात, आए थे 2014 में मां गंगा के लाल बनके, जाओगे 2019 में राफेल के दलाल बनके. मोदी म्हणता पेन जरी घेतले तरी पक्क बिल घ्या. पण राफेलचे बिल विचारले तर त्यांची बोबडी वळते. ज्या गेटवर चौकिदार उभे असतात त्या ठिकाणी नेहमी गरिबांसाठी दरवाजे बंद असतात, असे सांगत सिद्धू यांनी पीएम मोदींची नकल देखील केली. मोदी सांगतात की मी फकीर आहे, स्वयंसेवक आहे आणि कार्यकर्ता आहे. पण हे तरी सांगा ती तुम्ही पंतप्रधान आहात की नाही..., अशी बोचरी टीका सिद्धू यांनी केली.


भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारल्याने खळबळ, पाहा व्हिडिओ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 05:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...