'राफेल घोटाळ्याची महत्त्वाची फाईल पर्रिकरांच्या बेडरूममध्ये'

'राफेल घोटाळ्याची महत्त्वाची फाईल पर्रिकरांच्या बेडरूममध्ये'

ऑडिओ क्लिप समोर आणल्यानंतर काँग्रेसने राफेलच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 जानेवारी : राफेल कराराबाबतची महत्त्वाची फाईल माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे आहे, असा दावा करत काँग्रेसने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. जारी केलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये गोव्यातील भाजपचे मंत्री विश्वजीत राणे यांनी एक मोठा खुलासा केला आहे, असंही काँग्रेसचं म्हणणं आहे.

ऑडिओ क्लिप समोर आणल्यानंतर काँग्रेसने राफेलच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 'ऑडिओ क्लिपमध्ये भाजपचे मंत्री म्हणत आहेत की मनोहर पर्रिकरांकडे राफेलची महत्त्वाची माहिती आहे. मग राफेल कराराचं कोणतं रहस्य पर्रिकरांकडे आहे? सरकार राफेलच्या जेपीसी चौकशीला का घाबरत आहे?' असे अनेक प्रश्न काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केले आहेत.

लोकसभेत आज राफेलच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. त्याआधी काँग्रेसने ऑडिओ क्लिप जारी करून खळबळ उडवून दिली आहे. आता या प्रकरणात भाजपकडून काय उत्तर दिलं जातं, हे पाहावं लागेल.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी यााबत नुकतंच स्पष्टीकरण दिलं आहे. "सैन्याला दुर्बल करून माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले. मला जितक्या शिव्या द्यायच्या त्या द्या, जे आरोप करायचे ते करा, पण जवानांना त्यांच्या नशिबावर सोडणार नाही. देशाच्या सुरक्षेसाठी निर्णय घेणारच,", असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच राफेल करारावर स्पष्टीकरण दिलं आहे.

काँग्रेसने राफेल करारावरून पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केले. अखेर त्यांनी यावर सविस्तर प्रत्युत्तर दिले आहे. "हा माझ्यावर वैयक्तिक आरोप नाही. जर माझ्यावर कुणी आरोप केला असेल तर का आणि कुणी केला याचा शोध घेतला पाहिजे. संसदेत राफेल करारबाबत मी विस्तृतपणे सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टानेही या राफेल कराराबाबतची याचिकाच फेटाळून लावली आहे. फ्रान्सच्या पंतप्रधानांनीही याबद्दल खुलासा केला आहे. पण तरीही त्यांच्याकडून वारंवार आरोप होतं आहे. नुसतं दगड मारून ते पळून जात आहे. पण, त्यांनी जे आरोप केले आहे, त्यांनी सिद्ध करून दाखवावे", असं आव्हानच मोदींनी राहुल गांधी यांना दिलं आहे.

"त्यांना आरोप करण्याचा रोग जडला आहे. मी आधीच राफेलबाबत उत्तर दिलं होतं. संसदेत याची माहिती दिली आहे. पण, तरीही यावर सारखं सारखं बोलून का वेळ वाया घालावायचा, हे मला पटत नाही",असं ते म्हणाले.

काय आहे राफेल प्रकरण?

राफेल या लढाऊ विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा भ्रष्टाचार केला, असा राहुल गांधींचा आरोप आहे. 'राफेल विमानांची मोदी सरकारने अचानक किंमत वाढवली. तसंच भारतातील अनुभवी किंपनी 'एचएएल'ला डावलून राफेल करारामध्ये उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीचा समावेश करण्यात आला. हे सर्व अनिल अंबानींच्या वैयक्तिक फायद्यासाठी केलं गेलं,' असा राहुल गांधींचा आरोप आहे.

राफेलच्या मुद्द्यावरून गेले काही दिवस काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत. तसंच या मुद्द्यावरून राहुल यांनी राफेल विमान बनवणाऱ्या ‘दसॉ’ या कंपनीवरही आरोप केले होते.

VIDEO: 'पहिलं काम आपल्या जातीसाठीच', काँग्रेस मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

First published: January 2, 2019, 11:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading