अखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती!

सरकारकडून ३६ राफेल लढाऊ विमान खरेदीबाबत पूर्ण प्रक्रिया ही 2013 मध्ये निर्धारित करण्यात आलेल्या नियमांनुसारच करण्यात आली असं सांगण्यात आले आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 12, 2018 06:25 PM IST

अखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती!

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : राफेल विमान खरेदी कराराबाबत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या मध्ये विमानाचा करार कसा केला आणि विमानांची किंमत किती, याची कल्पना कोर्टाला बंद लिफाफ्यात देण्यात आली आहे. नियमांनुसारच करार केला गेला, सर्व कायदे आणि मार्गदर्शक तत्व पाळण्यात आली, असंही सरकारनं या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.


सरकारकडून ३६ राफेल लढाऊ विमान खरेदीबाबत पूर्ण प्रक्रिया ही 2013 मध्ये निर्धारित करण्यात आलेल्या नियमांनुसारच करण्यात आली असं सांगण्यात आले आहे.


सरकारने यासोबतच सांगितलंय की, "राफेल करारात भागीदार निवड करण्यात सरकाराची कोणतीही भूमिका नव्हती. दसाँ कंपनी भारत सरकारला आॅक्टोबर २०१९ पर्यंत भागीदार कोण आहे ? उत्पादन काय आहे ? अशी माहिती देण्यासाठी कटीबद्ध नाही."

Loading...


केंद्र सरकारने यात म्हटलंय की, ४ आॅगस्ट २०१६ रोजी ३६ राफेल जेट खरेदीबाबत अहवाल सादर केला तेव्हा याचा अर्थ आणि कायदा मंत्रालयाने अभ्यास केला आणि सीसीएसने २४ आॅगस्ट २०१६ रोजी मंजुरी दिली. त्यानंतर भारत आणि फ्रान्स दरम्यान २३ सप्टेंबर २०१६ रोजी करार पूर्ण केला.सुप्रीम कोर्टाने ३१ आॅक्टोबर रोजी राफेल कराराची प्रक्रिया कशी घडली याबद्दल माहिती देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज केंद्राकडून माहिती सोपवण्यात आली. तसंच कोर्टाने राफेल विमानाची खरेदी किती रुपयांमध्ये झाली याची माहितीही दहा दिवसांत देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी आता १४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.


राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिवक्ता मनोहर लाल शर्मा आणि अधिवक्ता विनीत ढांडा यांनी याचिका दाखल केली. त्यानंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनीही वेगळी याचिका दाखल केली.

तसंच माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी व्यक्तिगत याचिका दाखल केली आहे.

=================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2018 06:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...