नवी दिल्ली, 27 जुलै: भारतीय सैन्याची ताकद आता आणखीन वाढणार आहे. फ्रान्समधून भारताकडे येण्यासाठी राफेल लढाऊ विमानाची पहिली तुकडी रवाना झाली आहे. यामध्ये 5 विमानांचा समावेश आहे. त्यापैकी 2 विमान ट्रेनर आणि 3 लढाऊ विमानं असल्याची माहिती मिळाली आहे. अखेर राफेल विमानाची प्रतीक्षा संपली आहे. फ्रान्समधून राफेलचं उड्डाण झाल्यानं आता चीन आणि पाकिस्तानला सूचक इशाराच आहे.
सर्वात वेगवान आणि लढाऊ असणारं राफेल हे विमान फ्रान्सच्या मेरिनाक बेसवरून रात्री साडे बाराच्या सुमारास भारतात उड्डाण करणारे असून बुधवारी भारताच्या अंबाला एअरबेसवर पोहोचेल. ही पाच विमाने त्यांच्या भारत भेटीदरम्यान संयुक्त अरब अमिरातीच्या अबू धाबीजवळील अल-डाफ्रा फ्रेंच एअरबेसवर थांबतील. तेथून ते बुधवारी अंबाला येथे पोहोचतील.
ही विमानं भारताच्या ताफ्यात दाखल झाल्यानं भारताचं सैन्य बळ आता आणखीन वाढणार आहे. सीमेवर सातत्यानं कुरापती करणाऱ्या पाकिस्तान आणि चीनची आता धडगत नाही. ही 5 विमान बुधवारी (29 जुलैला) भारतात दाखल होणार आहेत.
#WATCH Rafale jet taking off from France to join the Indian Air Force fleet in Ambala in Haryana on July 29th. https://t.co/vrnXI82puO pic.twitter.com/ZMg1k2zvk8
— ANI (@ANI) July 27, 2020
#WATCH Rafale jets taking off from France to join the Indian Air Force fleet in Ambala in Haryana on July 29th. pic.twitter.com/6iMJQbNT9b
— ANI (@ANI) July 27, 2020
हे वाचा-मोठी बातमी! चीनला जबरदस्त झटका, भारत सरकारने आणखी 47 चिनी अॅप्स केले बॅन
भारत-चीन पूर्व लडाखमध्ये सुरु असलेल्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही विमान तिथे तैनात करण्याचा विचार सुरू आहे. या विमानाची हवेतून जमिनीवर 60 किमीपर्यंत अचून मारा करण्याची क्षमता आहे. वेगवान आणि अचून निशाणा साधणाऱ्या लढाऊ विमानमुळे भारतीय हवाई दलाची ताकद वाढली आहे.
सप्टेंबर 2016 रोजीमध्ये फ्रान्सबरोबर झालेल्या करारात भारताने सुमारे 58 हजार कोटींमध्ये 36 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. त्यापैकी 30 लढाऊ विमानं तर 6 प्रशिक्षण देणारी विमान असणार आहेत. त्यापैकी पहिली 5 विमानांची तुकडी बुधवारी भारताच्या ताफ्यात दाखल होत आहे.