राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला मोठा धक्का

राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला मोठा धक्का

राफेल प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला मोठा धक्का दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, प्रशांत लीला रामदास, 10 एप्रिल : राफेल प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला मोठा धक्का दिला आहे. राफेल प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. याप्रकरणामध्ये पुराव्यांचा कागदपत्रांवर घेतलेला आक्षेप हा सर्वोच्च न्यायालयानं फेटळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला ह मोठा धक्का मानला जात आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयानं कागदपत्रांवरील आक्षेप मान्य असल्याचं म्हटलं आहे.

राफेल खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. यासंदर्भात यशवंत सिन्हा, अरूण शौरी आणि वकिल प्रशांत भूषण यांनी सर्वाच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी राफेल खरेदीसंदर्भातील दस्तावेज चोरी झाल्याची माहिती सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिली होती. फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडून 36 राफेल विमानांची खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान, ही खरेदी अधिक दरानं झाल्याचा आरोप करत त्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. लोकसभा निवडणुकीमध्ये देखील सध्या हा मुद्दा गाजतोय.

SPECIAL REPORT: 'मेक इन इंडिया'ला झटका; स्वदेशी विमानाचं स्वप्न भंगलं

First published: April 10, 2019, 10:57 AM IST

ताज्या बातम्या