UP News: माजी मंत्री आणि भाजप आमदाराचं उपचारादरम्यान निधन, शुक्रवारी सकाळी घेतला अखेरचा श्वास

UP News: माजी मंत्री आणि भाजप आमदाराचं उपचारादरम्यान निधन, शुक्रवारी सकाळी घेतला अखेरचा श्वास

उत्तर प्रदेशमधून आणखी एका मोठ्या नेत्याच्या निधनाची बातमी समोर आली आहे. रायबरेली (Raebareli) मधील सलोन याठिकाणी भाजपाचे आमदार असणारे आणि माजी मंत्री दल बहादुर कोरी (BJP MLA Dal Bhadur Kori) यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे.

  • Share this:

मोहन कृष्ण, रायबरेली, 07 मे: उत्तर प्रदेशमधून आणखी एका मोठ्या नेत्याच्या निधनाची बातमी समोर आली आहे. रायबरेली (Raebareli) मधील सलोन याठिकाणी भाजपाचे आमदार असणारे आणि माजी मंत्री दल बहादुर कोरी (BJP MLA Dal Bahadur Kori) यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना लखनऊ (Lucknow) याठिककाणी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 7 मे रोजी, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे पार्टी कार्यकर्त्यांध्ये दु:खाचं वातावरण आहे. पक्षाचे ठराविक कार्यकर्ते आणि समर्थक त्यांच्या घरी दाखल झाले आहेत.

लोकांची सेवा करणारा आमदार म्हणून दल बहादुर कोरी यांची ओळख आहे. ते स्वत: म्हणायचे जर राजकारणात आले नसते तर त्यांनी मजुरी केली असती. ते असं म्हणायचे की, 'निवडणुका महाग झाल्या आहेत पण माझी जनता जनार्दन खूप चांगली आहे. माझ्या निवडणुकीसाठी पोस्टर व्यतिरिक्त कोणताही खर्च करावा लागत नाही.'

दल बहादुर कोरी 1996 मध्ये प्रथम सलोन विधानसभेचे आमदार झाले आणि राजनाथ सिंह मुख्यमंत्रीपदी असताना राज्यमंत्री झाले. 2004 मध्ये दल बहादूर कॉंग्रेसमध्ये दाखल झाले पण काँग्रेसकडून पदरी निराशा आल्याने 2014 मध्ये ते पुन्हा भाजपमध्ये परतले. यानंतर, 2017 मध्ये भाजपने पुन्हा तिकिटावर विधानसभा निवडणुका जिंकल्या. दल बहादूर यांच्या मेहनतीमुळे 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत अमेठी लोकसभेच्या सलोन विधानसभेत भाजपाने चांगली कामगिरी केली, आणि त्यामुळे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी याठिकाणी मोठा विजय नोंदवू शकल्या.

हे वाचा-मोठी बातमी! RLD अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचं कोरोनामुळे निधन

गुरुवारी देखील उत्तर प्रदेशमधून अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली होती. राष्ट्रीय लोक दलाचे (Rashtriya Lok Dal) अध्यक्ष अजित सिंह (Chaudhary Ajit Singh) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना काल घडली. अजित सिंह आणि त्यांची नात 22 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी फुप्फुसांमध्ये इन्फेक्शनमुळे अजित सिंह यांचं निधन झालं.

Published by: Janhavi Bhatkar
First published: May 7, 2021, 8:57 AM IST

ताज्या बातम्या