रायबरेलीत एनटीपीसी प्लांटमध्ये स्फोट, 15 ठार

उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथील नॅशनल थर्मल पॉवर कॉरपोरेशन (एनटीपीसी)च्या उंचाहार औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात बॉयलरच्या पाईपचा स्फोट झालाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2017 10:06 PM IST

रायबरेलीत एनटीपीसी प्लांटमध्ये स्फोट, 15 ठार

01 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथील नॅशनल थर्मल पॉवर कॉरपोरेशन (एनटीपीसी)च्या उंचाहार औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात बॉयलरच्या पाईपचा स्फोट झालाय. या भीषण स्फोटात 15  जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा जास्त कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत.

अपघातानंतर तातडीने बचाव आणि मदतकार्य हाती घेण्यात आले आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मात्र, गंभीर जखमींचं प्रमाण मोठं असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मॉरिशिअसच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी प्रशासनाला तातडीने बचावकार्याच्या सुचना दिल्या आहेत. बॉयलरचा स्टीम पाइप फुटल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

५०० मॅगावॅटच्या वीज निर्मिती केंद्रात हा स्फोट झाला आहे.  या स्फोटानंतर प्रकल्पाच्या ठिकाणी असलेले कामगार घाबरून सैरावैरा पळताना दिसत होते. सध्या खबरदारी म्हणून एनटीपीसी प्रकल्पाच्या हद्दीत बाहेरच्या लोकांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

दरम्यान, वीज निर्मिती केंद्रातल्या स्फोटानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे ३२ जवान रायबरेलीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2017 10:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...