Elec-widget

रायबरेली: न्यू फरक्का एक्सप्रेस रुळावरून घसरली, 7 प्रवाशांचा मृत्यू

रायबरेली: न्यू फरक्का एक्सप्रेस रुळावरून घसरली, 7 प्रवाशांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या हरचंदपूर इथे भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर इतर 35 प्रवासी गंभीर जखमी आहेत.

  • Share this:

उत्तर प्रदेश, 10 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या हरचंदपूर इथे भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर इतर 35 प्रवासी गंभीर जखमी आहेत. रेल्वे स्थानकाजवळ न्यू फरक्का एक्स्प्रेसचे ५ डबे रुळावरून घसरले. दुर्घटनेनंतर प्रवाशांचा गोंधळ उडाला आणि आरडाओरड सुरू झाली.

स्थानिक पोलीस, एनडीआरएफचं पथक आणि स्थानिकांकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये आणि या अपघातात जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये मदत देण्याचं जाहीर केलं आहे.

Loading...

उत्तर रेल्वेचे अधिकारी काजी महाराज अलाम यांच्या सांगण्यानुसार या अपघातात 14003 न्यू फरक्का एक्सप्रेसचे डबे रूळावरून खाली घसरले आहेत. या सगळ्या मदतकार्यासाठी रेल्वेने हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे. BSNL-05412-254145 आणि -027-73677 हे नंबर मदतीसाठी जारी करण्यात आले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, या अपघातात 2 लहान मुलं, एका महिलेसह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी एनडीआरएफपासून ते रेल्वे स्थानकावरील स्टाफ आणि उत्तर प्रदेश पोलीस संपूर्ण मदकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2018 10:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...