Elec-widget

राहुल गांधींशी जोडलं होतं नाव, आता होणार आमदाराची बायको

राहुल गांधींशी जोडलं होतं नाव, आता होणार आमदाराची बायको

रायबरेली मतदारसंघातील आमदार आदिती सिंग यांचे नाव काँग्रेस राहुल गांधी यांच्याशी जोडले जात होते. त्यांचे लग्न काँग्रेस आमदार अंगद सैनी यांच्याशी होणार आहे.

  • Share this:

रायबरेली, 17 नोव्हेंबर : उत्तरप्रदेशातील रायबरेली मतदार संघातील काँग्रेस आमदार आदिती सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आदिती सिंग यांचे लग्न पंजाबमधील काँग्रेस आमदार अंगद सैनी यांच्याशी होणार आहे. दिल्लीत 21 नोव्हेंबरला लग्न तर स्वागत समारंभ 23 नोव्हेंबरला होणार आहे. आदिती सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना याची माहिती दिली. आदिती यांनी सांगितलं की, वडिलांनीच त्यांचं लग्न ठरवलं होतं.

अंगद आणि आदिती हे दोघेही 2017 मध्ये आमदार झाले होते. दोघांचे कुटुंब राजकारणात असून अंगद सिंग यांनी 2017 मध्ये राजकारणात पाऊल टाकलं आणि शहीद भगत सिंग नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकले.

आदिती सिंग उत्तर प्रदेशातील सर्वात तरुण आमदारांपैकी एक आहेत. त्यांनी 2017 मध्ये 90 हजार मतांनी रायबरेलीमधून विजय मिळवला होता. त्यांचे वडील अखिलेश कुमार सिंग पाचवेळा रायबरेलीमधून निवडणूक जिंकले आहेत.

याआधी आदिती सिंग यांचे नाव काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबतही जोडलं गेलं होतं. तेव्हा राहुल गांधी यांच्यासोबत साखरपुडा झाल्याच्या अफवा असून ते भाऊ असल्याचंही आदिती सिंग यांनी सांगितलं होतं. तसेच आपण रक्षाबंधनाला त्यांना राखी बांधत असल्याचंही आदिती सिंगने सांगितलं होतं.

Loading...

डिलिव्हरीनंतरही HOT दिसतेय अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड, पाहा लेटेस्ट PHOTO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2019 09:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com