कोरोनाविरुद्धच्या लढाईत PM नरेंद्र मोदी घेणार Radio Jockeyची मदत, साधला संवाद

कोरोनाविरुद्धच्या लढाईत PM नरेंद्र मोदी घेणार Radio Jockeyची मदत, साधला संवाद

'रोडीओचा फार मोठा प्रभाव अजुनही आहे. त्यासाठी Radio Jockeyची मदत होऊ शकते. तरुणांनी अनेक चांगल्या आयडीया मला दिल्यात.'

  • Share this:

नवी दिल्ली 27 मार्च :  कोरोनाविरूद्धच्या लढाईत उपचारांबरोबर आश्यक आहे ती जनजागृती. भारतासारख्या खंडप्राय देशात अशा प्रकरची जनजागृती करणं प्रचंड अवघड काम असतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाच्या माध्यमातून नव नवे प्रयोग करण्यात कायम पुढाकार घेत असतात. कोरोना विरुद्ध जनजागृतीसाठी त्यांनी आता Radio Jockeyची मदत घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी त्यांनी देशातल्या निवडक Radio Jockeyसोबत आज व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला.

त्याबाबतची माहीती मोदींनी ट्विटरवरून दिली आहे. रोडीओचा फार मोठा प्रभाव अजुनही आहे. त्यासाठी Radio Jockeyची मदत होऊ शकते. आज मी त्यांना काही आयडीया दिल्या आणि त्यांच्याकडून नव नवीन आयडीया ऐकून घेतल्या असंही त्यांनी म्हटलं आहे.

देशात महाराष्ट्रात कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत तर महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. या दोन्ही शहरांतल्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी जोखीम पत्करत आपली सेवा देत आहेत, रुग्णांवर उपचार करत आहेत. याच सगळ्या कर्माचाऱ्यांप्रती कृतज्ञता म्हणून मोदींच्या आवाहनानंतर सगळ्या देशाने त्यांचं थाळी आणि घंटानाद करत अभिवादन केलं होतं.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या छाया सिस्टला फोन केला आणि त्यांचं कौतुक केलं. सगळा तुमचा कृतज्ञ आहे असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांच्या कौतुकाने छाया सिस्टर भारावून गेल्या आहेत.

काय सिस्टर कश्या आहात? असा प्रश्न मोदींनी त्यांना मराठीतूनच विचारला. तुम्ही काळजी घ्या, तुमच्या कुटुंबीयांचीही काळजी घ्या असं ते सिस्टर छाया यांना म्हणाले. तुम्ही अतिशय चांगलं काम करत आहात. तुमचे अनुभव कसे आहेत. असाही असंही त्यांनी छाया यांना विचारलं. त्यानंतर छाया यांनी त्यांचे अनुभव पंतप्रधानांना सांगितले.

आम्ही आमचं कर्तव्य करत आहोत. तुम्ही सगळ्या देशाचा कारभार बघता. एवढे व्यस्त असुनही तुम्ही फोन करून आम्हाला धीर दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद असं छाया सिस्टर पंतप्रधानांना म्हणाल्या.

First published: March 27, 2020, 11:44 PM IST

ताज्या बातम्या