लखनऊ, 22 मे : कानपूरमध्ये (Uttar Pradesh News) झुमक्याच्या नादात एक नवरीने सप्तपदी घेतल्यानंतर सासरी जाण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. नवरदेवाने नवरीसाठी सर्व दागिने सोन्याचे आणले होते. झुमके मात्र त्याने खोटे आणले होते. यामुळे नवरी रागावली. विशेष म्हणजे हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. पोलीस अधिकाऱ्यांनी नवरीच्या घरी जाऊन दोन्ही पक्षांशी चर्चा केली. सासरी आल्यानंतर तिला सोन्याचे झुमके घेऊन देऊ, असं वचन देण्यात आलं.
नवरीच्या झुमक्यांची ही मजेशीर बाब कानपूरमधील एका गावातील आहे. शुक्रवारी लग्नातील सर्व विधी पार पडले. मात्र सकाळी जेव्हा नवरीने सासरहून आलेले दागिने पाहिले तर त्यात झुमके खोटे होते. मग काय होणार होतं...नवरी आणि तिच्या कुटुंबीयांनी लग्नात गोंधळ घातला. इतकच नाही तर नवरीने पाठवणीस नकार दिला.
शेवटी स्वत: नवरदेव रोहीतने सांगितलं की, सर्व दागिने खरे आहेत. केवळ झुमके खोटे आहेत. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करीत दोन्ही पक्षाची समजून काढली.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.