'PM मोदी दुर्योधन नव्हे तर जल्लाद आहेत जल्लाद'

प्रियांका यांनी केलेल्या विधानावरील चर्चा अद्याप थांबली नसताना राबडी देवी यांनी मोदींबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे.

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 03:58 PM IST

'PM मोदी दुर्योधन नव्हे तर जल्लाद आहेत जल्लाद'

पाटणा, 08 मे: काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाभारतातील दुर्योधनाची उपमा दिली होती. प्रियांका यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानात आता बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी उडी घेतली आहे. प्रियांका यांनी केलेल्या विधानावरील चर्चा अद्याप थांबली नसताना राबडी देवी यांनी मोदींबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे.

राबडी देवी यांनी बुधवारी एक ट्विट केला. प्रियांका गांधींनी PM मोदींचा दुर्योधन म्हणून केलेला उल्लेख चुकीचा आहे. मोदींना दुर्योधन नाही तर जल्लाद म्हटले पाहिजे, असे राबडींनी म्हटले आहे. प्रियांका यांनी हरियाणातील अंबाला येथील एका सभेत मोदींची तुलना दुर्योधन यांच्याशी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रकवी रामधारी सिंह यांच्या दिनकर यांच्या कवितेचा उल्लेख केला. त्यावर राबडी देवी यांनी आज ट्विट केले. त्या म्हणाल्या, त्यांनी (प्रियांका) दुर्योधन म्हणून चूक केली. खर तर त्यांनी दुसरी भाषा बोलली पाहिजे. ते तर जल्लाद आहेत, जल्लाद. जे न्यायधीशांची पत्रकारांना मारून टाकतात, त्यांचे अपहरण करतात. अशा व्यक्तीचे मन आणि विचार क्रूर असतील.काय म्हणाल्या होत्या प्रियांका

Loading...

PM मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर एक असे म्हटले होते. त्याला उत्तर देताना दुर्योधनालाही असाच अहंकार होता आणि त्यानं दुर्योधनाचे आतोनात नुकसान झाले, असे प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या. काही मिनिटांत यावर अमित शहांचे उत्तर आले होते. दुर्योधन कोण ते २३ तारखेला जनताच दाखवेल, असा पलटवार शहांनी केला.


VIDEO: धारदार शस्त्रांनी घरफोडी, थरकाप उडवणारी घटना CCTVमध्ये कैद


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 03:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...