मोदींंचे हात,गळा कापू शकणारेही बरेच लोक आहेत-राबडी देवी

मोदींंचे हात,गळा कापू शकणारेही बरेच लोक आहेत-राबडी देवी

मोदींकडे बोट दाखवणाऱ्यांचे हात कापू असं विधान करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांना उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं.

  • Share this:

पाटना, 22 नोव्हेंबर: मोदींचा हात आणि गळा कापू शकणारेही बरेच लोक या देशात आहेत अशी टीका  बिहारच्या पूर्व मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांची पत्नी  राबडी देवी यांनी केली आहे. मोदींकडे बोट दाखवणाऱ्यांचे हात कापू   असं विधान करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांना उत्तरादेताना त्यांनी हे विधान केलं.

काल ओबीसी मेळाव्यात भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी मोदींकडे जे बोट दाखवतील त्यांचे हात कापू असं विधान केलं होतं. त्यावरून बरीच टीका करण्यात आली होती.त्यानंतर राय यांनी या विधानासाठी  माफीही मागितली होती. तसंच सीबीआयच्या नोटीसांबद्दल विचारले असता आपण या संस्थांना भीक घालत नाही आणि उत्तर ही देणार नाही असं उत्तर राबडी देवींनी दिलं.सीबीआयला जर राबडी देवींची चौकशी करायची असेल तर त्यांच्या घरी येऊन विचारावं अशी टीकाही त्यांनी केली.

एकंदरच नित्यानंद राय यांच्या विधानावरून बरंच रणकंदन माजलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2017 09:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading