अश्शी सून नको गं बाई!

अश्शी सून नको गं बाई!

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी या आपल्या मंत्री असलेल्या मुलांसाठी देशी सून शोधत आहेत. आपल्याला चित्रपट पाहायला जाणारी आणि मॉलमध्ये जाणारी सून नको. आपल्याला संस्कारी सून हवी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

  • Share this:

12 जून : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी या आपल्या मंत्री असलेल्या मुलांसाठी देशी सून शोधत आहेत. आपल्याला चित्रपट पाहायला जाणारी आणि मॉलमध्ये जाणारी सून नको. आपल्याला संस्कारी सून हवी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.रविवारी लालूप्रसाद यादव यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळेस त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली.

या कार्यक्रमात त्यांना मुलांच्या लग्नाविषयी विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी आपली ही इच्छा व्यक्त केली.राबडीदेवी आणि लालूप्रसाद यादव दाम्पत्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव हे बिहारमधील नितीश कुमार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री तर तेजप्रताप यादव हे आरोग्यमंत्री आहेत.

'माझी मुलं खूप धार्मिक आहेत. त्यामुळे आम्हाला मुलांसाठी चांगल्या संस्काराची सून हवी आहे. आम्हाला चित्रपटगृहात आणि मॉलमध्ये जाणारी मुलगी नकोय. घराला पुढे नेणारी, मोठ्यांचा आदर करणारी हवी. आम्ही जसे आहोत, अगदी त्याप्रमाणे आम्हाला सून हवी,' असे त्या म्हणाल्या.

First published: June 12, 2017, 1:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading