हे राम! गांधीजींबद्दल परिक्षेत विचारला 'हा' आक्षेपार्ह प्रश्न

हे राम! गांधीजींबद्दल परिक्षेत विचारला 'हा' आक्षेपार्ह प्रश्न

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

  • Share this:

सूरत, 13 ऑक्टोबर : राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल परीक्षेत विचारलेल्या प्रश्नामुळे वाद निर्माण झाला आहे. गांधीजींनी आत्महत्या करण्यासाठी काय केलं होतं? असा प्रश्न गुजराती विषयाची परीक्षा देणाऱ्या नववीच्या विद्यार्थ्यांना विचारला होता. चार गुणांसाठी हा प्रश्न होता.

एवढंच नाही तर 12 वीच्या विद्यार्थांनाही अजब प्रश्न विचारण्यात आला. त्यामध्ये तुमच्या परिसरात दारु विकणाऱ्या आणि दारुड्यांची दहशत वाढली आहे. त्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करणारे पत्र लिहा असा पाच गुणांसाठी प्रश्न विचारण्यात आला होता.

रिपोर्टनुसार, दोन्ही प्रश्न शनिवारी गांधीनगरमधील विकास संकुल स्कूलमध्ये गुजराती विषयाच्या परीक्षेत विचारण्यात आले. या प्रश्नांवरून वाद निर्माण झाला आहे. दारुच्या प्रश्नाबद्दल लोकांचे म्हणणे आहे की, राज्यात दारुबंदी आहे. अशा परिस्थितीत या प्रश्नाला अर्थ काय उरतो?

गुजरातचे शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंग चूडास्मा यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांचं उत्तर होतं की, ही गुजरात राज्याच्या शिक्षण मंडळाची प्रश्नपत्रिका नाही. या परीक्षेसाठी संबंधित विभाग प्रश्नपत्रिका तयार करतात. अशा प्रकारचे प्रश्न विचारणं योग्य नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

गांधीजी किशोरवयात असताना त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता. मित्राच्या वाईट संगतीमुळे काही चुका केल्या. त्याचा पश्चाताप म्हणून मित्रासोबत आत्महत्या करण्याचा विचार त्यांनी केला होता. एका निर्मनुष्य ठिकाणी जाऊन तिथं धोतऱ्याच्या बिय़ा खाण्याचं ठरवलं होतं. त्यानंही काही झालं नाही तर पुढं काय करायचं यावर मित्राशी चर्चा केली. त्यानंतर पुन्हा आत्महत्या न करण्याचा निर्णय घेत मंदिरात देवाच्या पाया पडून घरी परतले होते. गांधीजींनी त्यांच्या आत्मचरित्रात ही गोष्ट सांगितली आहे.

मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांसोबत मॉर्निंग वॉक, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 03:51 PM IST

ताज्या बातम्या