लुधियाना, 13 एप्रिल: देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. याच लॉकडाऊन दरम्यान बोहोल्यावर चढणाऱ्या नवरदेवाला कोरोना असल्याचं समजल्यानंतर खळबळ उडाली. पंजाबमधील फरीदकोट इथल्या मुलीचा विवाह मोगा इथल्या तरुणासोबत होणार होता. राज्यात कर्फ्यू आणि लॉकडाऊन असतानाही हा लग्नसमारंभ आयोजित करण्यात आला होता. महिन्याभरापूर्वी दोघांचा साखरपुडा पार पडतयानंतर 13 एप्रिलला लग्नाचा मुहूर्त ठरला. मात्र डोक्यावर अक्षता पडण्याआधीच नवरदेवाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं लग्नमंडपात मोठी खळबळ उडाली.
आरोग्य विभागानं नवरदेवाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर मुलीकडच्या आणि मुलाकडील कुटुंबीयांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन कऱण्यात आलं आहे. सर्वांच्या टेस्ट केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट्स निगेटीव्ह आले आहेत. मात्र तरीही या सर्वांना पोलीस आणि आरोग्य विभागानं होम क्वारंटाइन केलं आहे.
वाचा - मुंबईत कोरोनाबळी 100; बाधितांचा आकडा गेला 1549 वर
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 39 नमुन्यातील 4 जणांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले असून त्यांचा संबंध दिल्लीत झालेल्या निजामुद्दीन कार्यक्रमातील तबलिगी जमातशी असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तापसणी सुरू आहे. देशभरात लॉकडाऊन आणि पंजाबमध्ये कर्फ्यू असतानाही लग्न समारंभाला परवानगी कशी मिळाली असा सवालही उपस्थित केला जात आहे.
भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग आतापर्यंत 9 हजार 352 लोकांना झाला असून त्यापैकी 8048 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 324 रुणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 980 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कोरोनाशी लढणाऱ्या भारताचं महिलेनं केलं कौतुक, अमेरिकेत दाखल केला गुन्हा
लॉकडाऊनदरम्यान 1600 किमी अंतर चालत पोहोचला घरी, आई-भावाने दारंच उघडलं नाही