मराठी बातम्या /बातम्या /देश /

अचानक निघाला 14 फुटांचा अजगर, नंतर जे झालं ते पाहून सगळेच थक्क; पाहा VIDEO

अचानक निघाला 14 फुटांचा अजगर, नंतर जे झालं ते पाहून सगळेच थक्क; पाहा VIDEO

वन विभागाचे अधिकारी येईपर्यंत लोकांनी अजगाराचा रस्ता अडवून ठेवला होता. त्यालाही धोका जाणवल्याने तो अंगावर जाण्याचा प्रयत्न करत होता.

    गुवाहाटी 12 जुलै:  पावसाळा सुरु झाल्याने आता प्राण्यांचं जमीनी बाहेर येणं सुरू झालं आहे. आसामच्या (Assam) नागांव (Nagaon)मध्ये एका शेतात अचानक तब्बल 14 फुटांचा अजगर लोकांना आढळून आला. गावाच्या जवळच शेत असल्याने सगळेच लोक घाबरून गेले. आता नेमकं काय करायचं ते कुणालाच कळालं नाही. अनेक लोक शेतातच राहात असल्याने आता आपलं काय होणार या भीतीनेच अनेकांची गाळण उडाली. पण तातडीने वनविभागाचे लोक आले आणि त्यांनी त्या अजगराला ताब्यात घेतलं. वन विभागाचे अधिकारी येईपर्यंत लोकांनी अजगाराचा रस्ता अडवून ठेवला होता. त्यालाही धोका जाणवल्याने तो अंगावर जाण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी वन विभागाचे अधिकारी आले आणि त्यांनी शिताफीने प्रयत्न करत अजगराला एका पोत्यात बंद केलं. या भागात शेतांमध्ये वन्य प्राणी कायम आढळून येतात. या अजगराला आता जंगलात सोडून देण्यात येणार आहे. आसाममध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत असल्याने अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. गुवाहाटीमध्ये सरकारने कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 15 दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र ग्रामीण भागात कोरोनाचं लोन पोहोचून नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Python

    पुढील बातम्या