• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • PVC आधार कार्ड म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या फायदे

PVC आधार कार्ड म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या फायदे

आधार कार्ड (Aadhar Card) हे आपल्या आयुष्यातील महत्वाचं ओळखपत्र आहे. अगदी सिम कार्ड घेण्यापासून ते घर घेण्यापर्यंत आधार कार्डची गरज भासते. युनिक आयडेटिंफीकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (Unique Identification Authority of India)यावर्षी PVC आधारकार्ड आणलंय.

 • Share this:
  मुंबई, 26 मे : आधार कार्ड (Aadhar Card) हे आपल्या आयुष्यातील महत्वाचं ओळखपत्र आहे. अगदी सिम कार्ड घेण्यापासून ते घर घेण्यापर्यंत आधार कार्डची गरज भासते. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड लागतचं. आधार कार्डची ओळख झाल्यापासून त्यात अनेक बदल झाले आहेत. युनिक आयडेटिंफीकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (Unique Identification Authority of India) यावर्षी PVC आधारकार्ड आणलंय. हे आधारकार्ड वापरायला अगदी सोपं असून ते जास्त टिकाऊ आहे. आतापर्यंत आपलं आधारकार्ड प्रिंट स्वरुपात असायचं. मात्र आता UIDIA ने आधार कार्डच्या डिजीटल रुपाला मंजुरी दिली आहे. याचाच अर्थ हे आधारकार्ड तुम्ही फोनमध्ये डाऊनलोड करून सेव्ह करू शकता. जेव्हा तुम्हाला गरज भासेल तेव्हा तुम्ही डाऊनलोड केलेली कॉपी वापरू शकता. या आधारकार्डची सर्वात चांगली बाब म्हणजे तुम्ही एकच मोबाईल नंबर वापरून घरातील सर्वांचे PVC आधार कार्ड बनवून घेऊ शकता. याचा आकार अगदी छोटा असून एटीएम प्रमाणे तुम्ही तुमच्या खिशात ते ठेवू शकता. जसं हे वापरायला सोपं आहे, त्याचप्रमाणे ते बनवून घेण्यासाठी तुम्हाला अगदी कमी पैसे खर्च करावे लागतील. पीव्हीसी आधारकार्ड साठी तुम्हाला केवळ 50 रुपये खर्च करावे लागणार आहेत. पीव्हीसी आधार कार्ड बनवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा - 1. PVC आधार कार्ड बनवण्याचा अर्ज करण्यासाठी UIDAI च्या वेबसाइटवर uidai.gov.in अथवा resident.uidai.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. 2. वेबसाइटवर आपला आधार कार्ड नंबर, व्हर्चुअल आयडी नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल. 3 50 रुपये फी देऊन तुम्हाला आधार कार्ड ऑर्डर करावं लागेल. काही दिवसांनी ते तुम्ही दिलेल्या पत्त्यावर घरपोच येऊन जाईल. जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल तरीही तुम्ही पीव्हीसी आधाार कार्डसाठी अर्ज करू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.https://residentpvc.uidai.gov.in/order-pvcreprint या वेबसाईटवर जा. 2 तुमचा आधार कार्ड नंबर रजिस्टर करा. 3 सिक्योरिटी कोड भरा आणि खाली दिलेल्या my mobile not registered या ऑप्शनवर क्लिक करा. 4 त्यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी नंबर येईल तो ओटीपी नंबर तिथे टाका. 5 50रुपये भरल्यानंतर तुमचा अर्ज पूर्ण होईल. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर दोन आठवड्याच्या आत तुमचे पीव्हीसी आधार कार्ड तुमच्या घरी येईल आणि विविध सरकारी योजनांसाठी तुम्हाला त्याचा वापर करता येईल.
  First published: