जामिनावर सुटल्यानंतर लेफ्टनंट कर्नल पुरोहितना पुन्हा मिळणार पोस्टिंग

जामिनावर सुटल्यानंतर लेफ्टनंट कर्नल पुरोहितना पुन्हा मिळणार पोस्टिंग

कर्नल पुरोहित यांना जॉईन करून घेऊन पोस्टिंग देण्यात येईल पण चार्ज अॅक्टिव नसेल, अशीही माहिती मिळतेय.

  • Share this:

22 आॅगस्ट : जामिनावर सुटल्यानंतर लेफ्टनंट कर्नल पुरोहितना पुन्हा पोस्टिंग मिळणार, अशी सूत्रांची माहिती आहे. हे पोस्टिंग पुणे किंवा मुंबईत पोस्टिंग मिळण्याची शक्यता आहे.  कर्नल पुरोहित यांना जॉईन करून घेऊन पोस्टिंग देण्यात येईल पण चार्ज अॅक्टिव नसेल, अशीही माहिती मिळतेय.

आर्मी हेडक्वार्टर सुप्रीम कोर्टाच्या बेल जजमेंटचा अभ्यास करून सदर्न कमांडला पुढचे आदेश देईल.

दरम्यान लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांना तळोजा जेलमधून एनआयए कोर्टात नेण्यात आलंय.जेलमधून बाहेर पडताना ले. कर्नल पुरोहित यांनी सगळ्यांचे आभार मानले. मी देशासाठी बाहेर आल्याची प्रतिक्रिया आयबीएन लोकमतला त्यांनी दिली.

 

First published: August 22, 2017, 1:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading