मराठी बातम्या /बातम्या /देश /Jagannath Rath Yatra: पुरीमध्ये निघाली भगवान जगन्नाथांची रथ यात्रा, 2500 वर्ष जूनी परंपरा तुटली

Jagannath Rath Yatra: पुरीमध्ये निघाली भगवान जगन्नाथांची रथ यात्रा, 2500 वर्ष जूनी परंपरा तुटली

मंगळवारी सकाळी नऊ वाजता रथयात्रेला सुरुवात झाली. त्यामुळे सोमवारी सायंकाळी चार वाजेपासून शहरात कलम 144 लागू करण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळी नऊ वाजता रथयात्रेला सुरुवात झाली. त्यामुळे सोमवारी सायंकाळी चार वाजेपासून शहरात कलम 144 लागू करण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळी नऊ वाजता रथयात्रेला सुरुवात झाली. त्यामुळे सोमवारी सायंकाळी चार वाजेपासून शहरात कलम 144 लागू करण्यात आला आहे.

    नवी दिल्ली/भुवनेश्वर, 23 जून : मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) परवानगी दिल्यानंतर ओडिशाच्या पुरी इथे भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा (Jagannath Rath Yatra) काढली जाणार आहे. सुरुवातील सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली नव्हती पण त्यानंतर आदेश बदलून कोरोना साथीचा (Covid-19 Pandemic) वाढता प्रकोप पाहता भाविक या रथयात्रेमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत असं कोर्टानं म्हटलं आहे. यात्रेदरम्यान कोर्टाने ओडिशा सरकारला पुरी इथे कर्फ्यू लावण्याचेही निर्देश दिले आहेत. तसंच, 500 पेक्षा जास्त लोकांना रथ ओढू नका, रथ ओढणार्‍या सर्व लोकांची कोरोना टेस्ट झाली पाहिजे आणि सामाजिक अंतर पाळले पाहिजे अशा सूचना दिल्या आहेत.

    मंगळवारी सकाळी नऊ वाजता रथयात्रेला सुरुवात झाली. त्यामुळे सोमवारी सायंकाळी चार वाजेपासून शहरात कलम 144 लागू करण्यात आला आहे. तर या यात्रेमध्ये नियमांचं पालन केलं गेलं नाही तर यात्रा थांबवली जाऊ शकते अशी सक्त ताकीद सर्वोच्च न्यायालयाने ओडिशा सरकारला दिली आहे. पुरीशिवाय ओडिशात इतरत्र रथयात्रा काढला जाणार नाही असंही कोर्टानं म्हटलं आहे.

    कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषध कोरोनिल तयार, पतंजली आज जगासमोर आणणार

    सर्वोच्च न्यायालयाने दिले हे आदेश

    - पुरीमध्ये रथ यात्रेला गर्दी न करता मंजूरी देता येईल असं लाईव्ह लॉ वेबसाइटवर अपलोड केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटलं आहे.

    - 500 पेक्षा जास्त लोक रथ खेचू शकत नाहीत. अशा परिस्थितीत तीन रथ ओढण्यासाठी 1500 लोकांना आवश्यक असेल.

    - दोन रथ खेचण्यामध्ये एका तासाचं अंतर असलं पाहिजे.

    - जो कोणी रथ ओढतो त्याने कोरोना विषाणूची चाचणी केली पाहिजे.

    - रथ यात्रेच्या वेळी पुरीमध्ये कर्फ्यू लावावा.

    जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये मोठी चकमक, दोन दहशतवादी ठार तर CRPF जवान शहीद

    - रथ ओढणार्‍या यात्रेच्या आधी, दरम्यान आणि नंतरही सामाजिक अंतर राखणं गरजेचं आहे.

    - रथ यात्रेला भेट देणार्‍या सर्व लोकांची नोंद ठेवा. वैद्यकीय चाचणीनंतर, त्याच्या आरोग्याची माहितीदेखील नोंदवली पाहिजे.

    - रथ यात्रा आणि सर्व विधी इलेक्ट्रॉनिक माध्यमांना कव्हर करण्याची परवानगी देण्यात यावी.

    - सरकारी क्रूच्या म्हणण्यानुसार कॅमेरा बसवण्यास परवानगी द्यावी.

    पुलवामामध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना सोलापूरचे सुनिल काळे यांना वीरमरण

    सूर्यग्रहण झाल्यानंतर दोन दिवसांनीच निघाली रथ यात्रा - योगायोग

    दरम्यान, सूर्यग्रहण झाल्यानंतर दोन दिवसांनीच रथ यात्रा निघाली हा योगायोग आहे. तब्बल 5130 वर्षांपूर्वी सूर्यग्रहण झालं तेव्हा भगवान कृष्ण, भलराम आणि सुभद्रा यांच्यासमवेत कुरुक्षेत्रला गेले आणि त्यानंतर वृंदावन लोकांनी त्यांना रोखलं आणि सांगितलं की तुम्ही आमच्याबरोबर वृंदावनला चला. यानुसार, त्यांनी तीन रथ तयार केले आणि तिघांनाही वृंदावन घेऊन गेले. तेव्हापासून ही रथयात्रा सुरू झाली असं इस्कॉनचे राधाश्रमदास यांनी सांगितलं आहे.

    संपादन - रेणुका धायबर

    First published:
    top videos