विवाहबाह्य संबंधांचा संशय, हिलस्टेशनवर नेऊन निघृणपणे केली अभिनेत्रीची हत्या

विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन पतीनंच आपल्या मित्राच्या मदतीनं अभिनेत्रीची हत्या केली.

विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन पतीनंच आपल्या मित्राच्या मदतीनं अभिनेत्रीची हत्या केली.

  • Share this:
    डेहराडून, 13 फेब्रुवारी : सध्या देशभरात स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना उत्तराखंडच्या नैनीताल येथे आणखी एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. येथील कालाढूंगी, हल्द्वानी येथे 31 जानेवारीला एका महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला होता. पण त्यावेळी हा मृतदेह नेमका कोणाचा याची ओळख पटली नव्हती मात्र आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. नैनीताल येथे सापडलेला हा अर्धवट जळलेला मृतदेह दिल्ली येथे राहणारी 29 वर्षीय पंजाबी टीव्ही अभिनेत्री अनिता सिंग हिचा असल्याचं स्पष्ट झालं. अनिता हिचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन तिच्या पतीनंच आपल्या मित्राच्या मदतीनं तिची हत्या केल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी पोलिसांनी अनिताचा पती रविंद्र पाल सिंग आणि त्याचा मित्र कुलदीप याला अटक केली आहे. मोठा अपघात! भोपाळ रेल्वे स्टेशनच्या ओव्हर ब्रिजचा काही भाग कोसळला, 9 जणं जखमी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिताचा पती रविंद्र पाल सिंग याला आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्यानं तिला अभिनयाचं प्रशिक्षण घेण्यासाठी काही दिवस मुंबईला पाठवलं होतं. पण हे सर्व तसंच चालू राहिलं त्यामुळे रवींद्र यानं पत्नीच्या हत्येचा प्लान तयार केला. मी पळून गेलो नाही तर..., भक्ताच्या बायकोला घेऊन पळालेल्या महाराजाचा VIDEO VIRAL ‘आपल्या प्लान प्रमाणं रविंद्र फिरायला जाण्याच्या बहाण्यानं अनिताला घेऊन नैनीतालला गेला. तिथे गेल्यावर रवींद्रनं अनिताला झोपेच्या गोळ्या दिल्या नंतर झोपेतच गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर त्यानं आपल्या मित्राच्या मदतीनं तिचा मृतदेह ते राहत असलेल्या ठिकाणापासून दूर नेऊन जाळून टाकला.’ अशी प्रतिक्रिया नैनीतालचे एसएसपी सुनील कुमार मीणा यांनी दिली. गार्गी कॉलेज सामूहिक विनयभंग प्रकरणात 10 जणांना अटक, सीबीआय तपासाची मागणी
    First published: