मराठी बातम्या /बातम्या /देश /

VIDEO : कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन, ट्रॅक्टर पेटवून केला निषेध

VIDEO : कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन, ट्रॅक्टर पेटवून केला निषेध

रविवारी राष्ट्रपतींनी तीन कृषी विधेयकांवर स्वाक्षऱ्या केल्या असून तीनही विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं आहे

रविवारी राष्ट्रपतींनी तीन कृषी विधेयकांवर स्वाक्षऱ्या केल्या असून तीनही विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं आहे

रविवारी राष्ट्रपतींनी तीन कृषी विधेयकांवर स्वाक्षऱ्या केल्या असून तीनही विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं आहे

  • Published by:  Kranti Kanetkar
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : कृषी कायद्याविरोधात देशभरात विविध ठिकाणी शेतकरी आक्रमक झाले आहे. भाजप सरकारनं घाईगडबडीत तीन कृषी विधेयकं मंजूर करून त्याचं कायद्यात रुपांतर केल्यानं शेतकरी रोष व्यक्त करत आहेत. याचा उद्रेक पंजाब आणि दिल्लीत पाहायला मिळाला. दिल्लीच्या उच्च सुरक्षा विभागा अंतर्गत इंडिया गेटजवळ ट्रॅक्टरला आग लावून शेतकऱ्यांनी या कायद्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास ट्रॅक्टरला आग लावल्याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींची नावे मनजोत सिंग, रमनदीपसिंग सिंधू, राहुल, साहिब आणि सुमित अशी आहेत. ताब्यात घेण्यात आलेले सर्व तरुण हे पंजाब युवा काँग्रेसचे नेते असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय इंडिया गेट जवळून एक इनोव्हा कारदेखील पोलिसांनी जप्त केली आहे. हे वाचा-सिनेमागृह, स्विमिंग पूल होणार सुरू? आज जारी होऊ शकतात Unlock 5.0 च्या गाइडलाइन्स नवीन कृषी कायद्याविरोधात आक्रमकपणे आंदोलन करणाऱ्या 5 तरुणांना पोलिसांनी तातडीनं ताब्यात घेतलं. हे 5 जण जुना ट्रॅक्टर ट्रकमधून घेऊन आले होते. त्यांनी भररस्त्यावर हा ट्रॅक्टर पेटवून कृषी कायद्याविरोधात रोष व्यक्त केला मात्र पोलिसांनी तातडीनं त्यांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. रविवारी शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तीनही विधेयकांना (Farm Bills) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी देखील मान्यता दिली आहे. राष्ट्रपतींनी तीनही कृषी विधेयकांवर स्वाक्षरी केल्यांनंतर आता या तीनही विधेयकांचे कायद्यात रुपांतर झालं आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी कृषी विधेयकांविरोधात आंदोलनं करत आहेत. या दोन्हीही राज्यांमध्ये काँग्रेसने आधीच आंदोलनाला सुरुवात केली आहे.
First published:

Tags: PM narendra modi

पुढील बातम्या