मराठी बातम्या /बातम्या /देश /

पाकिस्तानच्या सीमेजवळ आणखी एक ड्रोन सापडला, शस्त्रास्त्रं आणल्याचा पोलिसांचा दावा

पाकिस्तानच्या सीमेजवळ आणखी एक ड्रोन सापडला, शस्त्रास्त्रं आणल्याचा पोलिसांचा दावा

भारत आणि पाकिस्तानच्या सीमेजवळ पंजाब पोलिसांना आणखी एक ड्रोन सापडला आहे. या ड्रोनमधून पंजाबमध्ये शस्त्रास्त्रं टाकली जात होती, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

अट्टारी (अमृतसर), 27 सप्टेंबर : भारत आणि पाकिस्तानच्या सीमेजवळ पंजाब पोलिसांना आणखी एक ड्रोन सापडला आहे. या ड्रोनमधून पंजाबमध्ये शस्त्रास्त्रं टाकली जात होती, असं पोलिसांचं म्हणणं आहे. याआधी, पंजाब पोलिसांनी एक अर्धवट जळालेलं वाहन जप्त केलं होतं. या वाहनातून पाकिस्तानमधून शस्त्रास्त्रं आणली जात होती. पंजाब आणि शेजारच्या राज्यात दहशत पसरवण्याचा हेतू यामागे होता.

पंजाबमधल्या महावा गावातही एक ड्रोन सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी 4 जणांना अटक केली होती. खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी गटाच्या या कारवाया होत्या, असं तपासात आढळून आलं.

या दहशतवाद्यांसोबत जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना या हल्ल्याचा कट रचत होती. या ड्रोनमध्ये हत्यारं, नकली चलन असं काही होतं का याबद्दल पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

आणखी 4 ड्रोन

सीमेवरच्या तरनतारन या भागात आसपासच्या भागात आणखी 4 ड्रोन लपवून ठेवण्यात आले आहेत, असंही पोलिसांनी सांगितलं. या ड्रोनमधून शस्त्रं आणली जात होती पण वजन जास्त झाल्यामुळे हे ड्रोन जाळून नष्ट करण्यात आले. पाकिस्तानमधून पंजाबमध्ये हत्यारं आणि स्फोटकं पाठवली जात होती, असं पंजाब सरकारने म्हटलं होतं. पंजाब पोलिसांच्या सांगण्यानुसार, मोठ्या प्रमाणात एके - 47 रायफल्स आणि ग्रेनेड मोठ्या प्रमाणात अमृतसरला पाठवण्यात आले.

घुसखोरीचं प्रमाण वाढलं

भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीरच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाल्यानंतर पाकिस्तानमधून घुसखोरीचं प्रमाण वाढलं आहे पण ही घुसखोरी रोखण्यासाठी लष्करही जोरदार प्रयत्न करतंय.लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाला सीमेवर पूर्ण खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीमेवर रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.

(हेही वाचा : नरेंद्र मोदी आणि इम्रान खान आज UN मध्ये येणार आमनेसामने, काश्मीरवर काय बोलणार?)

========================================================================================

VIDEO :...म्हणून ईडी कार्यालयात जाणार होतो, पवारांचा खुलासा आणि मानले सेनेचे आभार

First published:

Tags: India vs pakistan, Terrorism