Home /News /national /

पोलिसांच्या क्रूरतेचा VIDEO..!मुख्यमंत्र्यांना विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या तोंडात कोंबला कपडा

पोलिसांच्या क्रूरतेचा VIDEO..!मुख्यमंत्र्यांना विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या तोंडात कोंबला कपडा

पोलिसांच्या क्रूरतेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Video viral on social media) व्हायरल होत आहे.

    चंदीगड, 16 डिसेंबर: पोलिसांच्या क्रूरतेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Video viral on social media) व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ पंजाबमधील (Punjab) आहे. पोलिसांनी काही मुलींच्या तोंडात कापडा कोंबल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. काय झालं नेमकं काँग्रेसच्या यूपी प्रभारी प्रियंका गांधी वड्रा यांनी 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 'मी लढू शकते' असा नारा दिला. मात्र, आता त्यांना त्यांच्याच पक्षाच्या सरकारचे आव्हान आहे. पंजाबमधील संगरूरमध्ये पोलिसांनी काही मुलींचं तोंड पकडण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांना ओढत ओढत पोलिसांच्या गाडीमध्ये बसवून पोलीस ठाण्यात नेलं. ही संपूर्ण घटना मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या संगरूरमधील रॅलीदरम्यान घडली. ज्या पात्र शिक्षकांना नोकऱ्या मिळत नाहीत, त्यांच्यावर ही क्रूर पोलीस कारवाई करण्यात आली. हे सर्व लोक चन्नी यांच्या रॅलीच्या ठिकाणी जमले होते. घटनास्थळावरून हे व्हिडिओ समोर आले आहेत जी अस्वस्थ करणारी आहेत. घोषणाबाजी करणाऱ्या शिक्षकांना पोलीस रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. आंदोलकांनी मुख्यमंत्री आणि पंजाब सरकारचा धिक्कार करत घोषणाबाजी करताच पोलीस तोंडात कपडा कोंबताना दिसले. काँग्रेस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत एक अधिकारी महिला आंदोलकाला तिच्या कपड्यांसकट ओढताना दिसली. यानंतर महिला पोलीस बसमध्ये इतर अनेक आंदोलकांसह दिसली. एका पोलीस कर्मचाऱ्यानं तिला आतमध्ये कोंबून खिडकी बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांची गाडी तेथून निघाली. हेही वाचा- Pune: मित्र पत्नीवर करायचे बलात्कार अन् पतीला व्हायचा आनंद; 3 वर्षे सुरू होता भयावह प्रकार रॅलीला विरोध करणाऱ्या लोकांना मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांनी घेराव घातला. काही ठिकाणी मारहाणही करण्यात आली. एक व्यक्तीला आंदोलकांना पकडतानाही दिसला. सरकारवर टीका करण्यापासून रोखण्यासाठी तो व्यक्ती आंदोलकाचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न करत होता. इतरांनी पोलिसांना आंदोलकांना पकडण्यात आणि त्यांना गाडीमध्ये नेण्यास मदत केली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Punjab, Shocking viral video

    पुढील बातम्या