'या' बँकेत तुम्हाला खातं नसतानाही मिळू शकतं ATM

'या' बँकेत तुम्हाला खातं नसतानाही मिळू शकतं ATM

या बँकेत जा, खातं नसतानाही ATM कार्ड मिळवा आणि मनसोक्त खरेदी करा.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 एप्रिल: प्रत्येक छोटे मोठे व्यवहार आपण ATM कार्डवरून करतो. ATM कार्ड काढण्यासाठी आपल्याला बँकेत खातं उघडावं लागतं. ज्या बँकेत आपलं खातं आहे त्या बँकेचं ATM कार्ड आपल्याला मिळतं. मात्र आता एका बँकेनं ग्राहकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पंजाब नॅशनल बँकेत तुमचं खातं नसेल तरी तुम्ही ATM कार्ड काढू शकता असं नोटिफिकेशन नुकतच बँकेकडून जारी करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. हे ATM कार्ड Prepaid कार्डसारखं असेल. थोडक्यात सांगायचं तर हे कार्ड घेतल्यानंतर आधी तुम्हाला रिचार्ज करावा लागेल. रिचार्ज केल्यानंतर म्हणजे पैसे भरल्यानंतर हे कार्ड तुम्ही ATM सारखं वापरू शकता. पंजाब नॅशनल बँकेनं खास सुविधा उपलब्ध केली आहे. आवश्यकतेनुसार कार्डमध्ये पैसे भरून कार्ड वापरू शकता.

Prepaid ATM कार्ड सुविधा काय आहे?

पंजाब नॅशनल बँक सुविधा कार्ड असाही याचा उल्लेख केला जातो.  हे ATM सारख दिसणारं कार्ड आहे. आवश्यकतेनुसार तुम्ही कार्डमध्ये पैसे भरून हवे तसे हवे तिथे वापरू शकता.  तुमचं खातं असेल तर तुम्ही ह्या कार्डमध्ये पैसे इंटरनेट बँकिंगमार्फेत ट्रान्सफर करू शकता.

Prepaid ATM कार्डमध्ये किती पैसे ठेवू शकता

Prepaid ATM कार्डमध्ये कमीत कमी 500 ते 50,000 पर्यंत पैसे ट्रान्सफर करता येतात किंवा रिचार्ज करता येतो. या कार्डची वैधता 3 वर्षे असेल. कार्ड घेण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेत तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी असल्याचे पुरावे सादर करावे लागतील. KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँक तुमच्या नावे सुविधा कार्ड देण्यात येईल.

Prepaid ATM कार्ड स्वाईप मशीनसाठी ATM, क्रेडिट कार्डसारखेच स्वीकारण्यात येणार आहे. वस्तू खरेदी केल्यानंतर तुम्ही Prepaid ATM कार्डच्या माध्यमातून पैसे देऊ शकता. बँकेन आणलेलंं हे कार्ड ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार का? पंजाब नॅशनल बँकेच्या या सुविधा कार्डला ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.


VIDEO : 'निवडणुका आल्या की मोदी अंगात आल्यासारखं करतात'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: bank
First Published: Apr 7, 2019 09:28 PM IST

ताज्या बातम्या