Home /News /national /

शेतकरी आंदोनाचा भाजपला मोठा झटका! नगरपालिका निवडणुकांत कॉंग्रेसची आघाडी, भाजपला धक्का

शेतकरी आंदोनाचा भाजपला मोठा झटका! नगरपालिका निवडणुकांत कॉंग्रेसची आघाडी, भाजपला धक्का

पंजाबच्या नगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आहे. कॉंग्रेस मात्र आघाडीवर आहे. आपलाही फटका बसला आहे.

  चंदिगढ, 17 फेब्रुवारी: पंजाब नगर निगम निवडणुकांमध्ये (Punjab municipal corporation elections 2021) सात नगरपालिकांसह नगर परिषदांचे निकाल येणं सुरू झालं आहे. सुरवातीच्या कलांना निकालांमध्ये बदलत काँग्रेसनं आघाडी (congress gets lead) घेतली आहे. कृषी कायद्यांना पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा असलेला कडवा विरोध (farmers protest over the new farm laws) मतपेटीतूनही झळकला आहे. भाजप अगदीच बाहेर फेकला गेला आहे(BJP has lost many seats) . आम आदमी पार्टीसुद्धा (AAP) अनेक ठिकाणी चीत झाली आहे. अकाली दल (Akali Dal) दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनून समोर आला आहे. बाठिंडा, कपूरथला, होशियारपूर, फतेहगढ चुडिया या ठिकाणी भाजप आणि आम आदमी पक्षाला लोकांनी नाकारलं आहे. काँग्रेसनं मात्र मोठीच धडक मारली आहे. याचं श्रेय शेतकरी आंदोलनाला दिलं जात आहे. भठिंडा मध्ये 50 पैकी 43 जागांवर काँग्रेस जिंकली आहे. अबोहरमध्ये 50 पैकी 49, कपूरथलामध्ये 13 पैकी 10, होशियारपूर इथं 50 पैकी 41, फतेहगढ चुडिया इथं 13 पैकी 12 वॉर्डांमध्ये काँग्रेस विजयी आहे. मोगामध्ये 20 वॉर्डांमध्ये काँग्रेस, 15 जागांवर अकाली दल, एका जागेवर भाजपा, 4 जागांवर आप आणि बाकी 10 जागांवर इतर (आजाद) जिंकले. मोहाली नगर परिषदेचा निकाल गुरुवारी येईल. बठिंडामध्ये 50 वॉर्डांमध्ये 43 मध्ये काँग्रेसचे तर 7 वॉर्डांमध्ये अकाली दलाचे उमेदवार जिंकले आहेत. बटाला नगर पालिकेत काँग्रेसचे 35, अकाली दलाचे 6, भाजपचे 4, आपचे 3 उमेदवार जिंकले आहेत. एका अपक्ष उमेदवारानंही बाजी मारली आहे. मोगा नागरपालिकेच्या 50 पैकी काँग्रेसचे 20, अकाली दलाचे 15, भाजपचा 1, आपचे 4 आणि 10 अपक्ष उमेदवार जिंकले आहेत. पठाणकोट नगरपालिकेत काँग्रेसचे 37, अकाली दलाचा 1, भाजपचे 11 आणि एक अपक्ष उमेदवार जिंकला. होशियारपूरमध्ये एकूण 50 वॉर्डांपैकी 41 वर काँग्रेस, 4 जागी भाजप, 2 जागी आप आणि 3 उमेदवार इतर जागांवर जिंकले. कपूरथला  नगरपालिकेच्या 50 वॉर्डांपैकी 49 जागांवर निकाल आले आहेत. यात काँग्रेस 43, अकाली दल 3 असा विजय मिळाला आहे. आप आणि भाजप इथं खातंही उघडू शकले नाहीत. मोहाली नगरपालिकेचा निकाल गुरुवारी येईल. नगर कॉन्सिल आणि नगर पंचायत यांचे निकाल कपूरथला जिल्ह्याच्या सुल्तानपूर लोधी नगर कॉन्सिलमध्ये चित्र स्पष्ट झालं आहे. इथं 13 पैकी 10 वॉर्डांमध्ये काँग्रेस तर 3 जागा अकाली दलानं जिंकल्यात. फिरोजपूर जिल्ह्याच्या कस्बा मुदकी इथं 13 पैकी 5 जागांवर काँग्रेस आणि 8 जागांवर अकाली दलाचे उमेदवार विजयी झाले.

  हे वाचा - टूलकिट प्रकरण : गुप्त Whatsapp chat आलं समोर, दिशानं ग्रेटाला कळवली होती ही गोष्ट

  फतेहगढ साहिब जिल्ह्याच्या कस्बा मंढी गोबिंदगढ इथं 29 पैकी 19, 4 अकाली दल, 2 आप आणि 4 इतर खात्यांमध्ये गेले. संगरूर जिल्ह्याच्या अमरगढमध्ये 11 पैकी 5 वॉर्ड काँग्रेसनं, 5 शिअदनं आणि 1 आपनं जिंकला. लोंगोवालमध्ये 15 पैकी 9 वॉर्डांमध्ये काँग्रेस आणि 6 मध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाले. सुनाम इथं 23 पैकी 19 वॉर्डांमध्ये काँग्रेसचे उमेदवार तर 4 वॉर्ड अपक्ष उमेदवारांच्या खात्यात गेले. अहमदगढमध्ये 5 नगरसेवक काँग्रेसचे, 1 अकाली दलाचा, 1 आपचा आणि 1 अपक्ष निवडला गेला. धुरीमध्ये काँग्रेसनं 11 वॉर्डांमध्ये यश मिळवलं. 2 जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार जिंकले. 8 जागी अपक्ष उमेदवारांना विजय मिळाला. गुरुदासपूरच्या बटाला नगरपालिकेत 50 पैकी 35 काँग्रेस, अकाली दल 6 आणि भाजप 4 जागांवर निवडणूक जिंकली. आप 3 तर एका जागी अपक्ष उमेदवाराला विजय मिळाला. एका जागेचा निकाल अजून आलेला नाही. श्रीहरगोविंदपूर नगर कॉन्सिलमध्येही सगळ्या 11 वॉर्डांमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाले. 7 जागी अपक्ष, एका जागी अकाली दल आणि 3 जागी काँग्रेस जिंकली. फतेहगढ चुडिया इथं 13 पैकी 12 जागी काँग्रेस तर 1 नगरसेवक अकाली दलाचा बनला आहे. नाभा इथं दोन जागी अकाली, एका जागी अपक्ष आणि तीन जागांवर काँग्रेस निवडून आली आहे. अमृतसर जिल्ह्याच्या मजिठा इथं अकाली दलाचे 10, काँगेसचे 2 आणि एका अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. अजनालामध्ये 8 वॉर्डांमध्ये अकाली दल आणि 7 जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. राईया इथं 12 वॉर्ड काँग्रेसच्या खात्यात गेले आहेत. एका वॉर्डात टाय झाला आहे. जंडियाला गुरू इथं 6 जागांवर काँग्रेस आणि पाच वॉर्डांमध्ये अकाली दल जिंकलं आहे. रमदास नगर पंचायत इथं काँग्रेस जिंकली. 8 वॉर्डांमध्ये काँग्रेस तर 3 जागी अकाली दल विजयी झालं आहे. जालंधर जिल्ह्यात नूरमहल नगर पालिकेत सगळ्या 12 वॉर्डांमध्ये अपक्ष उमेदवार जिंकले. करतारपूर नगर कॉन्सिलमध्ये 15 पैकी 9 वॉर्डांमध्ये अपक्ष तर 6 जागी काँग्रेस उमेदवार जिंकले. अलावलपूर नगर पालिकेत सगळ्या 10 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. लोहिया नगर पंचायतीत 10 जागी काँग्रेस आणि 3 जागी अपक्ष उमेदवार जिंकले. रूपनगर जिल्ह्यात नंगल नगर पंचायतीसाठी आतापर्यंत आलेल्या निकालानुसार काँग्रेस 15 जागांवर जिंकली. भाजप 2 तर अपक्ष 2 जागी जिंकला आहे. लुधियाना जिल्ह्याच्या खन्ना नगर कॉन्सिल इथं 33 पैकी काँग्रेसचे 15,  शिरोमणी अकाली दलाचे 6,आपचे 2, भाजपचा 1 आणि 2 स्वतंत्र उमेदवार जिंकले आहेत. 6 वॉर्डांचे निकाल येणं बाकी आहे. जगराओ इथं 23 पैकी काँग्रेस 20, शिअद 1, 2 वॉर्डांमध्ये स्वतंत्र उमेदवार जिंकला आहे. रायकोटमध्ये सगळ्या 15 वॉर्डांमध्ये काँग्रेस जिंकली आहे. नगराध्यक्ष काँग्रेसचाच असेल. समरालाच्या 15 पैकी 10 जागी काँग्रेस आणि 5 जागी शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार जिंकले आहेत. पायल इथल्या 11 वॉर्डांपैकी काँग्रेसचे 9, शिअदच्या ऐका उमेदवारानं विजय मिळवला आहे. एक नगरसेवक अपक्षचा बनला आहे. दोराहा इथल्या 15 पैकी 11 वॉर्डांमध्ये काँग्रेस, 2 जागी शिअदचे उमेदवार विजयी झाले. एका वॉर्डात आप तर एका जागी अपक्ष उमेदवार जिंकला. साहनेवाल च्या 15 पैकी केवळ एकाच वॉर्डात पोटनिवडणुका होत्या. तिथं शिअद विजयी झाली. मुल्लापूर दाखां च्या 13 पैकी 8 वॉर्डांमध्ये पोटनिवडणुका होत्या. सगळ्या जागी काँग्रेस निवडून आली. मोहाली नगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल गुरुवारी येईल. इथं निवडणूक आयोगानं वॉर्ड नंबर 10 च्या बूथ नंबर 32 आणि 33 मध्ये दुसऱ्यांदा निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. हेही वाचा राहुल गांधी यांनी दलित महिलेशी लग्न करावं, रामदास आठवलेंचा सल्ला पंजाबच्या अबोहर, बठिंडा, बटाला, कपूरथला, मोहाली, होशियारपूर, पठाणकोट आणि मोगासोबत 8 नगरपालिका आणि 109 नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी 14 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. एकूण 2302 वॉर्डांसाठी 9222 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण 4102 मतदान केंद्रांपैकी 1708 केंद्रं संवेदनशील होती. 161 केंद्रं अतिसंवेदनशील होती.  अनेक ठिकाणी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये विवाद आणि मारामारी झाली.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: BJP, Congress, Farmer protest, Modi government, PM narendra modi, Punjab

  पुढील बातम्या