पंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड!

पंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड!

या हल्ल्याचा सुत्रधार पाकिस्तानात लपलेला अतिरेकी हरमीत सिंह पीएचडी असल्याची धक्कादायक माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.

  • Share this:

अमृतसर, ता. 19 नोव्हेंबर : पंजबामधल्या ग्रेनेड हल्ल्याचं पाकिस्तानी कनेक्शन आता पुढं आलंय. पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी ISI ने काही कडव्या खालिस्तान समर्थक युवकांना हाताशी धरून हा हल्ला घडवून आणल्याची माहिती गुप्तचर सूत्रांना मिळालीय. या हल्ल्याचा सुत्रधार पाकिस्तानात लपलेला अतिरेकी हरमीत सिंह पीएचडी असल्याची धक्कादायक माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.


अमृतसर जवळच्या अदलीवाल या गावात निरंकारी भवनमध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात रविवारी 3 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी झाले होते. राष्ट्रीय तपासं संस्था NIA सुद्धा या घटनेचा तपास करत आहे. ISI ही पंजाबमधल्या काही अतिरेकी संघटनांना खतपाणी घालत आहे.


पंजाब पोलिसांना वॉन्टेड असलेले वधावा सिंह बब्बर, परमजीत सिंह पंजवाड़, हरमीत सिंह पीएचडी, लखबीर सिंह रोडे या कट्टर अतिरेक्यांनी पाकिस्तानामध्ये आश्रय घेतला असून ISI त्यांना सर्वप्रकारची मदत करते. काही काश्मिरी तरूणांच्या मदतीने पीएसडीने या हल्ल्याचा कट रचला होता.


हरमीत सिंह पीएचडी

                                                                                                                               हरमीत सिंह पीएचडी


या हल्ल्यासाठी काही स्थानिक तरूणांची निवड करण्यात आली. आणि त्यांना ग्रेनेड हल्ल्याचं ट्रेनिंग काही मोबाईल Apps च्या माध्यमातून देण्यात आलं. ग्रेनेड फेकून पळून जायचं अशी नवी स्ट्रॅटेजी अतिरेके पंजाबमध्ये वापरत आहे. या प्रकारात हल्ला करून पळून जाणं सोपं असतं.


पंजाबमध्ये असलेल्या खालिस्तानच्या स्लीपर सेलने स्थानिक मुलांना पैसे पुरवून हँडग्रेनेड उपलब्ध करून दिले अशीही माहिती पुढं आलीय. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही पाकिस्तानच्या सहभागाची शक्यता बोलून दाखवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2018 03:37 PM IST

ताज्या बातम्या