Home /News /national /

Punjab milk rate : पंजाबच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी भगवंत मान सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Punjab milk rate : पंजाबच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी भगवंत मान सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पंजाबमधील दूध उत्पादक शेतकरी मागच्या कित्येक दिवसांपासून दुधाच्या दरात वाढ करण्यासाठी सरकारकडे मागणी करत होते. (punjab milk rate)

  चंदिगढ, 25 मे : पंजाबच्या भगवंत मान सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या (Milk producers) बाजूने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने दूध खरेदीच्या दरात 55 रुपयांनी वाढ केली आहे. (Milk producers punjab government big decision) गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दूध खरेदीच्या दरात वाढ करण्याची मागणी केली जात होती. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या चाऱ्यापासून ते जनावरांपासून सर्वच उत्पादनांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा स्थितीत सध्याच्या दराने दूध विक्री केल्यास तोटा सहन करावा लागत आहे. या मागणीवरून राज्य सरकारने दूध खरेदीच्या दरात वाढ केली आहे. (Punjab govt raises milk purchase rates)

  पंजाबचे सहकार मंत्री हरपाल सिंग सीमा यांनी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति किलो दुधाच्या फॅटवर आधारित दूध खरेदी दरात 55 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. दुधाच्या खरेदी दरात वाढ झाल्यामुळे विक्री दरात कोणताही परिणाम होणार नाही, असे मंत्री हरपाल सिंग म्हणाले.

  हे ही वाचा : पेट्रोल-डिझेलनंतर आता खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

  100 रुपयांनी वाढ करण्याची मागणी केली होती

  प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशन (पीडीएफए) च्या नेतृत्वाखाली दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी 21 मे रोजी मोहाली येथे सार्वजनिक क्षेत्रातील दूध डेअऱ्यांनी दूध खरेदीच्या किमतीत वाढ करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. दुधाच्या फॅटच्या आधारे खरेदी दरात प्रतिकिलो 100 रुपये वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. मात्र, सरकारने दूध खरेदीच्या दरात प्रतिकिलो फॅट 55 रुपयांनी वाढ केली आहे.

  हे ही वाचा : monsoon update : मुंबईकरांची heat wave पासून सुटका नाहीच, मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता

  पीडीएफए संघटनेचे अध्यक्ष दलजितसिंग सदरपूरा म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत दुधाचे दर वाढलेले नाहीत, तर दूध उत्पादन खर्च जवळपास दुप्पट झाला आहे. सोयाबीनचा भाव एका वर्षापूर्वी 3,200 रुपये प्रति क्विंटलवरून 7,200 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. तसेच इतर वस्तूंच्या किमतीही वाढल्याने दुग्ध व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. योग्य मोबदला न मिळाल्याने निराश झालेल्या अनेक दुग्ध व्यवसायिकांनी आपली जनावरे विकण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर कोरोना काळात दुग्धव्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे.

  मिल्कफेडनेही दरात वाढ केली आहे

  यापूर्वी मिल्कफेडने 21 मे पासून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या दूध खरेदी दरात प्रति किलो फॅट 20 रुपयांनी वाढवण्याची घोषणा केली होती. यावर्षी मार्चमध्ये मिल्कफेडने आधीच प्रतिकिलो 50 रुपयांनी वाढ केली आहे. दूध उत्पादकांना चांगला भाव दिला आहे. शेतीनंतर ग्रामीण भागातील जनतेचा दूध उत्पादन हा मुख्य व्यवसाय असल्याचे मिल्कफेडचे व्यवस्थापकीय संचालक कमलदीप सिंग संघा यांनी सांगितले. मिल्कफेड आपल्या दुध उत्पादकांना इतर शेजारील राज्यांपेक्षा जास्त दूध खरेदी दर आधीच देत असल्याचे ते म्हणाले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Punjab

  पुढील बातम्या