पंजाब सरकारने 'करून दाखवलं', शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

पंजाब सरकारने 'करून दाखवलं', शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी निकषांमध्ये अडकलेली असताना पंजाब सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली.

  • Share this:

19 जून : महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी निकषांमध्ये अडकलेली असताना पंजाब सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी तर पाच एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जातून दोन लाख रुपयांची कर्जमाफी सूट देण्यात येणार आहे. या कर्जमाफीचा पंजाबमधील एकोणीस लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी 5 एकर असणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी दिलीये. त्यामुळे 8.75 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. तर दोन लाखांहुन जास्त असलेल्या कर्जबाजारी  शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.  एवढंच नाहीतर ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांचा कर्जाचा भारही सरकारने उचललाय. अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची नुकसान भरपाई पाच लाख देण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2017 11:44 PM IST

ताज्या बातम्या