मराठी बातम्या /बातम्या /देश /

दोन मुलांच्या त्रासाला कंटाळली युवती, आईला LIVE VIDEO कॉल करून घेतला गळफास

दोन मुलांच्या त्रासाला कंटाळली युवती, आईला LIVE VIDEO कॉल करून घेतला गळफास

पंजाबमधील बरनाळा येथे राहणाऱ्या एक तरुणीनं मलेशियातील 2 तरुणांना कंटाळून लाईव्ह व्हिडीओ कॉल करत आत्महत्या केली.

पंजाबमधील बरनाळा येथे राहणाऱ्या एक तरुणीनं मलेशियातील 2 तरुणांना कंटाळून लाईव्ह व्हिडीओ कॉल करत आत्महत्या केली.

पंजाबमधील बरनाळा येथे राहणाऱ्या एक तरुणीनं मलेशियातील 2 तरुणांना कंटाळून लाईव्ह व्हिडीओ कॉल करत आत्महत्या केली.

  • Published by:  Priyanka Gawde

बरनाळा (पंजाब), 25 जानेवारी : पंजाबमधील बरनाळा येथे राहणाऱ्या एक तरुणीनं मलेशियातील 2 तरुणांना कंटाळून लाईव्ह व्हिडीओ कॉल करत आत्महत्या केली. या मुलीनं राहत्या घरात फॅनला गळफास लावून आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी मृत मनु राणीचा छळ करीत होते. मृत तरुणीने याआधी पोलिसात तक्रार दाखल केली आहे, परंतु पोलिसांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. यामुळेच या निष्पाप मुलीने आपले आयुष्य संपवले, असे मृत मनु राणीच्या घरच्यांचे म्हणणे आहे.

वाचा-कारखान्याने 3 वर्षांपासून पगारच न दिल्याने कर्मचाऱ्याची आत्महत्या, मृतदेह ताब्यात घेण्यास पत्नीचा नकार

या प्रकरणी मृत मनुचे वडील कुलविंदर सिंग यांनी सांगितले की त्यांची मुलगी मनु 21 वर्षांची होती. गेल्या वर्षी त्याने मनुला मलेशियात पाठविले होते. दरम्यान काही महिन्यांआधी दोन आरोपींपैकी एकाने मनुला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळं कुलविंदर सिंग यांनी कर्ज काढून आपल्या मुलीला मलेशियात पाठविले. कुलविंदर सिंग यांनी याआधीच आरोपीविरुद्ध पोलिसात तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली नाही.

वाचा-कोल्हापूरमध्ये कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू, 5 गंभीर

मुनेने आरोप छळ करत असल्याचे आपल्या आईला सांगितले होते. त्यांनी आरोपींची नावेही दिली आहेत. कुलविंदर यांनी असा दावा केला आहे की मनुच्या फोटोसोबत छेडछाड करून तो फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या धमक्यांना कंटाळून मनुने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

वाचा-आईच्या कुशीतलं बाळ घेऊन नाचू लागले तृतीयपंथी, 20 दिवसांच्या बालकाचा मृत्यू

या प्रकरणी बर्नलाचे एसपी गुरदीप सिंह यांनी, दोन आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत, ज्यांना अटक लवकरच करण्यात येईल, असे सांगितले.

First published:

Tags: Attempt suicide