मराठी बातम्या /बातम्या /देश /पंजाबच्या राजकारणात पुन्हा भूकंप? माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीच्या दौऱ्यावर

पंजाबच्या राजकारणात पुन्हा भूकंप? माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीच्या दौऱ्यावर

पंजाबच्या राजकारणात आता पुन्हा एक नवा भूकंप येणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पंजाबच्या राजकारणात आता पुन्हा एक नवा भूकंप येणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पंजाबच्या राजकारणात आता पुन्हा एक नवा भूकंप येणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पंजाबच्या राजकारणात (Punjab Politics) पुन्हा एक भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन अमरिंदर सिंह हे दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा (Captain Amarinder Sinhg on Delhi tour) आहे.

सूत्रांकडून मिलालेल्या माहितीनुसार, दिल्लीसाठी दुपारी साधारणत: 3.30 मिनिटांनी कॅप्टन अमरिंदर सिंग रवाना होणार आहेत. त्यानंतर दिल्लीत दाखल होताच सायंकाळच्या सुमारास कॅप्टन अमरिंदर सिंग हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि जे पी नड्डा (J P Nadda) यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबतच्या मतभेदानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेस पक्षाने चरणजीत सिंग चन्नी यांना पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. नाराज असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग हे काँग्रेसला राम राम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं होतं की, मला अगदी अपमानास्पद झाल्यासारखं वाटले त्यानंतर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अमरिंदर सिंग यांनी असंही म्हटले होते की, काँग्रेसने 2022 मध्ये बहुमत मिळवलं तर ते नवज्योत सिंग सिंद्धूला मुख्यमंत्री होऊ देणार नाही. नवज्योत सिंग सिद्धू याच्या विरोधात प्रबळ उमेदवार देणार असल्याचंही ते म्हणाले होते.

चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होती. पण, अखेर काँग्रेसच्या हायकमांडने सर्व आमदारांची सहमती घेऊन चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. चरणजीत सिंग चन्नी हे मुख्यमंत्री होणार अशी घोषणा पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी ट्वीटद्वारे केली होती. चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावापूर्वी सुखजिंदर सिंग रंधावा यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होतं. पण, अखेरच्या क्षणी चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा केली.

पंजाबच्या राजभवनात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी 20 सप्टेंबर रोजी चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. चन्नी आणि त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंजाबी भाषेत शपथ घेतली. विशेष म्हणजे चन्नी हे पंजाबचे मुख्यमंत्री पद भूषवणारे पहिले दलित आहेत. 58 वर्षीय चन्नी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी उपमुख्यमंत्री म्हणून ओपी सोनी यांचं नाव अवघ्या अर्धा तास आधी समोर आलं.

First published:
top videos

    Tags: Amit Shah, BJP, Punjab, काँग्रेस