मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोठी बातमी! अमरेंद्र सिंगांचा भाजपमध्ये प्रवेश, पंजाबमध्ये वाहणार बदलाचे वारे?

मोठी बातमी! अमरेंद्र सिंगांचा भाजपमध्ये प्रवेश, पंजाबमध्ये वाहणार बदलाचे वारे?

अमरेंद्र सिंग यांनी अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

अमरेंद्र सिंग यांनी अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

अमरेंद्र सिंग यांनी अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरेंद्र सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा, मुलगी भाजपमध्ये जाणार असले तरी त्यांच्या पत्नी परणीत कौर या मात्र काँग्रेसमध्येच राहणार आहेत.

अमरेंद्र सिंह हे त्यांचा पंजाब लोक काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहेत. दरम्यान आजच्या प्रवेशानंतर भाजपकडून सिंह यांना मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. दरम्यान या प्रवेश कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरेंद्र सिंग हे काही वेळापूर्वी भारतीय पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले होते.

त्यांच्या या प्रवेशामुळे पंजाबच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेली अनेक वर्षे काँग्रेसचा किल्ला असलेल्या पंजाबमध्ये भाजप वर्चस्व करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

First published:

Tags: Punjab